एप्रिल 2022

पूरक विचार

आपले शरीर

आपले शरीर म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक यंत्रच आहे. यंत्राला जशी शक्ती लागते तशी शक्ती आपणाला अन्नातून मिळते.

पचनसंस्थेमध्ये अन्नाचे रुपांतर शक्ती देणार्‍या रसायनांमध्ये होते.

  1. ही रसायने रक्तामधून लिव्हरकडे जातात व त्यातील आवश्यक घटक लिव्हरमध्ये राहून अनावश्यक द्रव्ये अशुध्द रक्तवाहिन्यांतून र्‍हदयाच्या उजव्या भागात येऊन तेथून रक्त फुफ्फुसाकडे जाते.
  2. फुफ्फुसात श्र्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन त्यामध्ये मिसळला जातो व शुध्द रक्त र्‍हदयाच्या डाव्या भागात येते. तेथून ते शुध्द रक्तवाहिन्यांतून सर्व शरीरभर पसरते.
  3. शरीरातील अवयवांचे कार्य त्यातील पेशींमार्फत चालते. व तेथे काही नको असलेली रसायने निर्माण होतात.
  4. ही निर्माण झालेली अनावश्यक द्रव्ये किडनीमध्ये असलेल्या लाख्खो गाळण्यांमधुन गाळली जाऊन लघवीवाटे बाहेर फेकली जातात.
  5. पुनरुत्पादन हे जीवंत सृष्टीचे वैशिष्ट्य.  माणसाच्या शरीरात त्यासाठी स्त्री व पुरूष जननेंद्रीये पुनरुत्पादनाचे कार्य करतात.
  6. काम करण्यासाठी शरीराची हालचाल आवश्यक असते. हातापायांचे स्नायू, हाडे, सांधे यांची रचना त्या हालचाली होण्यासाठी योग्य प्रकारे केलेली असते.
  7. शरीरातील  मोठ्ठाल्या हाडांमधील पोकळीचा उपयोग शरीराची संरक्षणयंत्रणा तयार करण्यासाठी केला गेला आहे. जंतूंचा शरीरावर हल्ला झाला तर हाडाच्या पोकळीतील या यंत्रणेमधील आवश्यक अशा पेशी रक्यामध्ये येऊन जरूर असलेल्या भागात जातात व जंतूंना प्रतिकार करण्याचे कार्य करतात. यालाच आपण प्रतिकार शक्ती म्हणतो.
  8. या सर्व कार्यावर नियंत्रण मेंदू व मज्जातंतूंचे असते (यांचे कार्य कॉम्प्युटर प्रमाणे चालते असे म्हणता येईल). थॉयराईड, पॅंक्रीअस इत्यादी ग्रंथींमार्फत रासायनिक घटनांमध्ये नियंत्रण व समन्वय  होतो.

आपले आरोग्य व आजार :

वरती वर्णन केलेल्या शरीराच्या कामांमध्ये समन्वय एवढा चांगला असतो की सर्वसाधारणपणे आपण आरोग्याचे नियम पाळले तर आजारपण क्वचितच येते. या शरीर यंत्राची कार्यक्षमता  किती असते याची 2-3 उदाहरणे पाहुया म्हणजे तुम्हाला खात्री पटेल.

  1. तोंड उघडा व तोंडाने हवा हातावर बाहेर सोडा. गरम हवा बाहेर आलेली जाणवेल. अशी ही रासायनिक भट्टी शरीरात सतत चालू असते.
  2. आता दुसरे उदाहरण. समजा तुम्ही रस्त्यात उभे आहात व समोरून कार येत असली तर तुम्ही पटकन धावत जाऊन रस्त्याच्या कडेला जाता.

या सर्वाला वेळ किती? फक्त 1-2 मिनिटे.

3. आता प्रयोगशाळेत तपासता येईल असे उदाहरण. समजा तुम्हाला जंतुंमुळे ताप आला व तुमचे रक्त तपासले तर रक्तातील पांढर्‍या पेशींची संख्या जास्त असते. कारण त्या रोगजंतूंना मारतात.

अशा या कार्यक्षम शरीराला मनाची साथ असावी लागते. पुढील सत्रात मनाचा विचार करुया.

April 2022

Supportive Thinking

Our body is a wonderful machine created by the nature. Machine needs energy to operate. Energy for our body-machine is provided through food.

  1. Digestive system converts the food into bio-molecules providing energy.
  2. These bio-molecules enter blood and thereafter taken to liver. Liver absorbs the essential part of it and rest goes to the right side of heart via blood vessels called veins. From right side of heart blood travels to lungs.
  3. In the lungs oxygen is mixed from inhaled air and carbon dioxide is thrown out through exhalation. Oxygenated blood travels to the left slide of heart and when heart is contracted it reaches to all cells via blood vessel called arteries.
  4. Cells are the working units of all organs and systems in our body.
  5. During the course of chemical changes in the cells unwanted molecules are produced. These are filtered in kidneys and thrown out in the form of urine.
  6. Reproduction is the basic property of living world. Genital organs in male and female are different and are responsible for reproductive process.
  7. Movement is again a basic aspect of living world. Bones, muscles and joints participate in movements of the human body.
  8. The hollow space in the bone is used to produce what can be called as army to allow body to fight with environmental onslaughts like infections. The so-called immune system is a part of this mechanism.
  9. The control over all these interrelated processes occur through brain and nerves (work as of a computer). Thousands of chemical processes are controlled through secretions called hormones produced by endocrine glands like thyroid, pancreas etc.

Integrated functioning of all these operations is so efficient that if we observe certain rules of healthy life, disease will rarely visit us. Few examples  noted below will show the efficiency of this bodily machine.

  1. Open your mouth and exhale by putting your hand in front of mouth. Feel the heated air. This chemical factory in the body is working all the time.
  2. Another example. Suppose you are standing in the middle of street and you see a car coming. The chain of events will be –


All these events occur in a minute or two.

3. One laboratory test. If you have infection and fever. Your blood examination will show increased white blood cells. They are required to flight with the germs.

Such efficient body also needs healthy mind. We will consider it in the next session.