ऑक्टोबर 2022

शेती व्यवस्थापन

शेतीचे व्यवसाय व्यवस्थापन

कुटुंबाची आर्थिक जबाबदारी योग्यपणे संभाळता यावी या दृष्टीकोनातून शेतीकडे बघायचे असेल तर कुठल्याही व्यवसायाच्या काही मुलभूत संकल्पना असतात त्याचा विचार करणे जरूरीचे आहे. त्याबद्दल या सत्रात जाणून घेऊया. 

  1. व्यवसाय : ध्येय व उद्दिष्टे

शेतीसंबंधी विचार करतांना एक महत्वाची गोष्ट म्हणजे जीवसृष्टीतील एक महत्वाच्या घटकाचा आपण अर्थार्जनासाठी उपयोग करीत आहोत.  जीवसृष्टीतील इतर घटक म्हणजेच जीवजंतू, इतर प्राणी, मनुष्यप्राणी व वनस्पती यांचे जीवन एकमेकांशी निगडीत असते. तो समतोल ढळणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे असते. तो समतोल राखणे हे ध्येय ठरविले तर त्याकडे पोहोचावयास कालानुरूप बदल करावे लागतील. अशा रीतीने ती एक अखंड चालणारी प्रक्रिया असेल हे लक्षात ठेवावे लागेल.

उद्दिष्टे म्हणजे त्या वाटचालीतील काही ठराविक कालावधित पोहोचावयाचे टप्पे.

2. व्यवस्थापन : रचना व कार्य –

अ) संचालक मंडळ – संचालक मंडळ हे विचार करून काय करावयाचे, कसे करावयाचे याचा आराखडा करणारे असते. ती जबाबदारी घेणारे जेवढे चांगले असतील तेवढी त्या गृपची प्रगति चांगली होईल.

ब) व्यवस्थापक – यामध्ये (1) मुख्य व्यवस्थापक व (2) इतर वेगवेगळ्या कामांवर देखरेख ठेवून त्यामध्ये सहभागी होणारे असतात.

मुख्य व्यावस्थापक जेवढा चांगला तेवढी गृपची प्रगती लवकर व चांगली होते. त्याचे मुख्य काम म्हणजे इतर व्यवस्थापकांना एकत्रितपणे आणून जे काम अपेक्षित आहे ते नीटपणे झाले पाहिजे. विश्र्वास, प्रामाणिकपणा व त्याच्या कर्तव्याची जाणीव, हे गूण त्याच्यामध्ये असणे महत्वाचे असते. प्रत्येक माणसाला त्याच्या योग्यतेचे काम देणे व सर्वांमध्ये एकोप्याची वृत्ती आणणे हे प्रयत्नपूर्वक करावे लागेल. व्यवस्थापनात किती माणसे आहेत त्यापेक्षा ती एक दिलाने कसे काम करीत आहेत हे महत्वाचे असते.

क) संचालक मंडळाने लक्षात ठेण्यासारखे – व्यवस्थापक मंडळातील माणसांवर व कामगारांबरोबर सुसंवाद असणे महत्वाचे असते. अस्थिर परिस्थितीत निर्णय घेणे हे आवश्यक असते. कोणत्या दिशेने जावयाचे हे विचारपूर्वक ठरवावे. उदा. सरकारी मदत, बॅं केचे कर्ज घ्यावे-न घ्यावे इत्यादी. उद्योग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्याची दिशा तसेच संख्यात्मक आणि  गुणात्मक मूल्यमापन करणे गरजेचे असते.

ड) जबाबदार कामगार – नवीन शिकण्याची वृत्ती व मन लावून काम करणे महत्वाचे असते. अखेर कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. त्यांच्यामध्ये आपलेपणाची जाणीव निर्माण करणे गरजेचे असते. कामगारांना आपणही या गृपचे महत्वाचे घटक आहोत असे वाटले पाहिजे.

नोव्हेंबरमधील सत्रात आपण या विषयाबद्दल अधिक माहिती घेऊया.

October 2022

Management of Agriculture

Business management in Agriculture

Any occupation whether it is an agriculture or other, it is based on some fundamental concepts. While looking at an agriculture, as an occupation i.e., a source to earn money to handle financial responsibilities of our family properly, we have to think over these concepts. In this session fundamental concepts of any occupation are discussed.

I) Occupation –

Aim and objectives –

Thinking about an Agriculture, the most important thing is, we are using important element of living world, to earn money. The life of other elements of living world such as pathogens, other animals, human beings, and plants are co-related with each other. It is necessary to look after that the balance among all these factors should not disturb. If our aim is to maintain that balance, changes will need to be made over time to achieve it. In this way, we have to remember that it is a continuous process.

Objectives are the different stages to be reached in definite period of time.

II) Management: Structure and Function-

  1. Board of directors –

The board of directors prepares a plan, by thinking about what to do? and how to do? the better the people who take that responsibility, the better the progress of the group.

2. Manager –

It includes a main manager and other persons, who look after different other works. The more efficient main manager is, the more will be progress of that group. His main job is to bring out co-ordination among all other managers, for completion of expected work properly and within the decided time period. It is important that main manager should have qualities such as reliability, trustworthiness, honesty and awareness of duty. Special efforts have to take for developing attitude of working together with harmony and peace, among everyone and assigning work to each person as per their capabilities. In management, quality is more important than quantity. How many people are working is not important, rather, whether they are working together and single hearted is more important.

3. Board of directors to keep in mind –

It is important to have good communication between management and workers. Decision making is essential in difficult situations. Direction to proceed further should be chosen deliberatively. For ex. to take help from government or to take loan from bank etc. Business is a continuous process. It is necessary to evaluate its direction quantitatively and qualitatively.

4. Responsible workers –

Worker is most Important factor. An attitude of learning new things and work with dedication is important. It is needed to develop a sense of belonging, among the workers. Workers should feel that, they are also important factor of the group.

We will see more information about it in the November session.