ऑगस्ट २०२३

जीवनशैली: एक नवीन प्रयोग

विचार

संदर्भ: Dr. S. S. Apte यांचे लेख

कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पुढील प्रश्र्न विचारावेत :

  1.  हे काय आहे?
  2.  कसे आहे?
  3.  कशासाठी आहे?

विचाराबद्दल ” हे काय आहे “ असे विचारले तर थोडेसे गोंधळल्यासारखे होईल. कारण विचार काही दाखविता येत नाहीत. पण डोक्यात विचार येतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी अशिक्षित माणूस सुद्धा “विचाराने डोके फुटण्याची वेळ आली“ असे म्हणत डोक्याकडे हात नेतो. डोके म्हणजेच त्यातील मेंदू, हे विचार निर्मितीचे म्हणजे मनाचे स्थान. तेथे नेमके काय होते व विचार येतात? आपणाला आपली पाच ज्ञानेंद्रिये माहीत आहेत. डोळ्याने बघणे, कानाने ऐकणे, त्वचेचा स्पर्श, नाकाने येणारा वास व जीभेने कळणारी चव. यांना घेऊनच आपण जगात वावरतो. या सर्व ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला संवेदना जातात.  बऱ्याचशा अज्ञात असलेल्या रासायनिक घटना मोठ्या मेंदूत घडून विचारांची निर्मिती होते. आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपणाला एक पक्षी दिसला. तर दिसण्याचे काम डोळ्याने केले, पण त्याचवेळी त्याने केलेली किलबिल आपण कानांनी ऐकली. कदाचित पूर्वी तशा प्रकारच्या पक्ष्याला हात लावलेला आठवून त्या स्पर्शाची आठवणही आपणाला होईल. म्हणजेच मेंदूला ज्ञानेंद्रियांकडून संवेदना मिळाल्या तसेच मेंदूमध्ये असलेल्या स्मरणशक्ती केंद्राकडूनही संवेदना जाऊन मेंदूमध्ये म्हणजेच मनामध्ये विचार तयार झाला. पण मन म्हणजेच मेंदू का? तर नाही. मेंदूची अनेक कार्ये असतात. त्यातील एक, पण अतिशय महत्वाचे म्हणजे विचार करणे. मन म्हणजे अशा विचारांचा गठ्ठा. भारतीय तत्वज्ञानात मनावर वेगळ्या रीतीने विचार केला आहे. पण तो या लेखाचा विषय नाही. थोडक्यात विचार हे काय आहे याचे उत्तर वर वर्णन केल्याप्रमाणे मेंदूमधील अनेक घटनांच्या संयोगातून जे काही निर्माण होते ते म्हणजे विचार.

आता वेगवेगळे विचार कसे असतात ते बघूया. समजा लाडू सुंदर रीतीने रचून ठेवलेले एक ताट आहे. एखाद्याच्या मनात विचार येईल ’वा! भूक लागली आहे, लाडू खायला मिळणार“ (विचाराचा शरीरकार्याशी संबंध). दुसरा माणूस असेही म्हणू शकेल  ’छे ! आपण सतत गोड खात असतो. उगीच मधुमेह मागे लागायचा“ (बौध्दिक विचार). कुणा एकाच्या असेही मनात येईल “असेच लाडू माझ्या बहिणीच्या लग्नात होते“ व तिच्या आठवणीने तो कासावीस होईल (भावनिक विचार). त्याचवेळी त्याची बायको विचार करीत असेल “काय सुंदर रचना आहे, नुसते बघत रहावे“ (सौंदर्यवादी विचार). एखाद्या दयाळू माणसाच्या मनात येईल ’हे लाडू त्या बिचा उपाशी माणसाला द्यावेत“ (नैतिक/आत्मिक विचार). आता पहा दृश्य तेच पण विचारांचे प्रकार वेगळे.

विचार कशासाठी आहेत याचे अचूक उत्तर कठीणच आहे. मात्र माणसाच्या मनात क्षणोक्षणी असंख्य विचार येऊन त्याचे गठ्ठे म्हणजे ज्याला आपण मन म्हणतो ते तयार होते. विचारांची गर्दी झाल्यावर माणसाने त्याची संगतवार रचना करायला सुरवात केली. वेगवेगळ्या ज्ञानशाखांची सुरवात तेथून झाली. आता या घटनांकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया. आपण ज्ञानेंद्रियांमार्फत वस्तूस्थितीचे (Facts) आकलन करतो. पुढची विचारांची पायरी म्हणजे त्या वस्तुस्थितीतील घटकांना काही विशिष्ट दृष्टिकोन समोर ठेऊन त्यांची मांडणी करतो. ही झाली माहिती (Information). वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीची जुळवाजुळव करून संकल्पना (Concept) तयार होते. उदहरणार्थ, शाळा ही संकल्पना घेतली तर त्यामध्ये शिक्षकांबद्दल माहिती आली, इमारत व शाळेमधील इतर सोयींची माहिती आली, तेथे शिकविले जाणारे विषयही लक्षात घ्यावे लागतील. थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमवून शाळेची संकल्पना तयार होते. आता आणखी पुढे जाऊया. जेव्हा आपण शिक्षण या ज्ञानशाखेचा (Knowledge area) विचार करतो तेव्हा त्यामध्ये इतरही संकल्पना येतात. शिक्षणाचा मूळ हेतू, प्राथमिक/माध्यमिक शिक्षण अशा अनेक संकल्पना त्या ज्ञानशाखेत येतात. शेवटी महत्वाचे म्हणजे या सर्व ज्ञानाचा योग्य रितीने उपयोग करून जीवन सुखमय करणे. यासाठी वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा समन्वय साधून विचार करावा लागतो. त्याला शहाणपण असे आपण म्हणतो. ही विचारांची शेवटची पायरी म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या काळात होऊन गेलेले विचारवंत हे सर्व विचार कसे मांडतात ते बघूया. पहिल्या दोन कविता असल्याने त्यांचे भाषांतरीत रूप मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  1. ज्ञान व शहाणपण यांची खरे तर फारकतच आहे.

 ज्ञानी माणसांचे मन दुसऱ्याच्या विचाराने भरलेले असते.

 शहाणी माणसे आत्म परीक्षणात गढलेली असतात.

ज्ञान म्हणजे ओबडधोबड पदार्थांचा गठ्ठाच.

त्याला पैलू पाडून, जागच्याजागी बसवून येते शहाणपण.

तसे नाही केले तर आत्मनाश अटळ.          

ज्ञानाला असतो गर्व स्वतच्या सामर्थ्याचा

शहाणपण नम्रपणे कबुली देते अज्ञानाची.

                                       (विल्यम कॉपर  : 1731 – 1800)

                                              (कविता संग्रहातून)

2. चक्र फिरते आहे असंख्य कल्पनांचे, कृतीचे

   असंख्य शोधांचे, प्रयोगांचे

   आपण धावतच आहोत, विश्रांती कुठे आहे?

   गोंगाट चालू आहे, पण शांतता कुठे आहे?

   ज्ञान आहे, पण शहाणपण कुठे आहे?

  माहितीच्या जंजाळात ज्ञानच नष्ट झाले आहे.

                                       (टी. एस्. इलिअट)

3. ज्ञान हे लहान मुलासारखे असते. त्याला काही मिळाले की रस्त्यावरून ओरडत, धावत सुटते.

   शहाणपण बराच काळ ज्ञानाला शांततेच्या उबेत लपेटून ठेवते.

                                       (महर्षि अरविंद)

या लेखाचे प्रयोजन असे की पहिल्या लेखात मांडलेले प्रश्र्न आपणाला सोडवायचेच असतील तर ते विचारांच्या सामर्थ्यावर म्हणजे ज्ञानाधिष्ठित मार्गांनी सोडवावे लागतील. सध्या आपल्यासमोर असलेल्या काही समस्या पुढील प्रमाणे –

  1. पैसा हे साध्य झाल्याने विश्वास, प्रेम, नीतिमत्ता की ज्यावर सुसंस्कृत समाजाची उभारणी होते तो पायाच डळमळीत होऊ लागला आहे.
  2. मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे त्या नैसर्गिक संपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे.
  3. आपल्या भारतीय समाजाच्या बाबतीत आणखी एक प्रश्र्न म्हणजे एकजिनसीपणाचा अभाव. प्रांतीय, धार्मिक, जातीय, पक्षीय अशा अनेक घटकांनी आपण समाज म्हणून दुभंगलेलेच आहोत. हे मला प्रकर्षाने जाणवले ते वैशाली करमरकर यांचे “संस्कृती रंग“ हे पुस्तक वाचून. त्यांनी तुलना केली आहे ती युरोपीय देशांशी. आपल्या देशात मात्र वेगवेगळे प्रांत अजूनही आपले वेगळेपण जपून आहेत.

या समस्या कशा सोडवता येतील ते पुढील लेखात (नोव्हेंबर 2023) पाहुयात.

August 2023

Supportive thinking

Thinking and Thoughts

Ref.: Articles by Dr. S.S. Apte.

When we think on anything, we should ask following three questions:

  1. What is it ?
  2. How is it ?
  3. Why is it ?

If we are asked “what is thought” we may get little confused, because we can not show them. But we know that the seat of thoughts is the brain or the head. Even an illiterate person will hold his head with both hands and will say “I just can’t think’. It is true that thoughts originate in the head or more specifically in the brain. What happens in the brain which results into thoughts? We all know that we see with eyes, hear through ears, feel the touch via skin, smell through nose and feel the taste by tongue. All these

sensations are carried to the brain by nerves. In the brain, number of chemical alterations occur (mostly unknown) which ultimately result into what we call as thoughts. Let us have an example. We observe a bird. We see it by eyes. At the same time we hear his chirping sound through ears. It may be that we may remember the incidence when we touched a similar bird and felt it so nice. Therefore it is not only the sensory inputs through various organs but also the memory centre in the brain participate in the thought process what we call as thinking. Process of thinking is occurring all the time in the brain and heaps of thoughts are produced what we call as mind. In Indian Philosophy mind has different connotations. But that is not the subject of this article. To sum up, thought is the result of synthesis of number of inputs in the brain.

Now let us think further. Suppose there is a plate having beautifully arranged laddus in it. Someone will think “Oh! I am hungry. I will have laddus to eat” (thought in relation to bodily function). Another gentleman may think that it is not good for health to eat too much of sweets. It may lead to Diabetes. (Intellectual thought). Third person may get the memory of laddus at the time of his sister’s wedding and may feel uneasy as he has not met her for a long time. (Emotional thought) At the same time his wife may think “How nice is the arrangement of laddus”. (Aesthetic thought). A kind hearted person standing nearby says “Why not give these laddus to a poor hungry person? (Moral/Spiritual thought). The same sight evokes different types of thoughts.

An accurate answer to the questions about the purpose of thoughts is really difficult. The fact is that every moment our mind is crowded with countless thoughts. That perhaps let man to arrange them systematically. This is the origin of different branches of knowledge. Let us look at these developments from a different perspective. We observe the world around through different senses and note down the facts. Next step of thinking involves putting the facts in sequence with a purpose. This is information. Information from various sources results into concept formation. For example, the concept of school will include information about teachers, school building, the subjects taught in the school, other amenities and so on. In short concept formulation demands gathering information on different matters and put it in sequential fashion to get the picture as a whole. Let us think further. When we think of education as a knowledge area there are many concepts associated with it. It encompasses the concepts like the purpose of education, primary and secondary education and so on. Ultimately it is necessary to integrate various knowledge areas to make our life happy. Wisdom lies there. This is the last stage of  thought process. We find the same sentiments echoed by various thinkers in the past.

  1.  “Knowledge is a child with it’s achievements, for when it has found out something, it runs about the streets whooping and shouting, wisdom conceals her for a long time in a thoughtful and mighty silence” – Sri Aurobindo   

2. The endless cycle of ideas and action.

Endless invention, endless experiment.

Brings knowledge of motion, not stillness.

Knowledge of speech but not of silence.

Where is life we have lost in living.

Where is wisdom we have lost in knowledge.

Where is knowledge we have lost in information.

– T. S. Elliot

3. Knowledge and wisdom far from being one,

Have off-times no connection. Knowledge dwells

In head replete with thoughts of other men,

Wisdom in minds attentive to their own

Knowledge, a rude unprofitable mass,

The mere material with which wisdom builds,

Till smooth’d and squar’d and fitted to it’s place,

Does but encumber whom it seems to enrich

Knowledge is proud that he has learned so much’

Wisdom is humble that he knows no more.

– Willam Cowper ( 1731- 1800)

The purpose of this article is to indicate that the questions raised in the first article are to be solved through integrated thinking, in other words in a wise manner. Let us recapitulate the fundamental issues involved in solving the problems.

  1. Money has assumed the supreme position in life. This has led to the deterioration in value system, as well as  love and trust, the foundation on which human society rests.
  2. More serious consequence of the process is the fast decline of natural resources essential for human existence.
  3. One major problem with Indian society is the lack of cohesiveness.  As a society we remain divided by many regional, religious, castes and political forces. I became intensely aware of this when I read Vaishali Karmarkar’s recently published book “Sanskrutirang” She has given examples of European nations where national spirit dominates.

In the next session (Nov 2023) we will see how to resolve these issues.