ऑगस्ट २०२३

शेती व्यवसाय व्यवस्थापन

झेंडू शेती

संदर्भ.:  Marigold cultivation/marigoldfarming/crop guide,

 Horticulture: flower crops:: marigold,

सुधारित पद्धतीने झेंडू लागवड ( श्री.सुचित लाकडे),

       झेंडू सुधारित लागवड तंत्र(डॉ. विनायक शिंदे-पाटील,श्री.प्रदीप भोर),

  आर.सी. एफ. शेतीपात्रिका (ऑक्टोबर २०२१)

झेंडू हे भारतातील एक महत्वाचे व लोकप्रिय फूलपीक आहे. झेंडूमधील विविध रंगछटा, आकार, आकर्षकपणा व टिकाऊपणा इत्यादी गुणधर्मामुळे शेतकऱ्यांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये हे पीक लोकप्रिय आहे. झेंडूच्या फुलांना नेहमीच मागणी असते. हार बनविणे, निरनिराळ्या पुष्परचनांमध्ये तसेच विविध ठिकाणी सजावटीसाठी या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भरपूर मागणी, चांगला भाव, कमी खर्च आणि खर्चाच्या तुलनेत जास्त उत्पादन या बाबींमुळे महाराष्ट्रात झेंडू पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. या सत्रात आपण झेंडू शेतीबद्दल माहिती घेणार आहोत.

हवामान: महाराष्ट्रातील हवामानात हे पीक वर्षभर घेता येते. झेंडूचे पीक उष्ण व कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले येते. झेंडूला सरासरी १८-२०°c. तापमानाची गरज असते. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती तापमानामुळे झाडांची वाढ खुंटते.

जमीन: झेंडूचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. पण हलक्या ते मध्यम जमिनीत झेंडूची वाढ चांगली होते. या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी व सामू ७-७.५ पर्यंत असलेली जमीन चांगली मानवते.

लागवड पूर्व तयारी : लागवडी आधी जमीन एकसारखी समान व तणमुक्त, तसेच पाण्याचा योग्य निचरा होईल अशा पद्धतीने तयार करावी. जमीन नांगरून भुसभुशीत करून त्यानंतर छोटे छोटे वाफे तयार करावेत. तयार केलेल्या जमिनीस हलके पाणी द्यावे. एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत व नत्र, स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे.  नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण खते या भागात पुढे दिले आहे.

रोप निर्मिती : रोपवाटिका करण्यापूर्वी ३ बाय १ मीटर या आकारमानाचे व २० सेमी उंचीचे ६-७ गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यासाठी जमीन भुसभुशीत करावी. प्रत्येक वाफ्यात ५० ग्रॅम १९:१९:१९ व ८-१० किलो चांगले शेणखत मिसळावे.  गादीवाफ्यावर बियाणे टाकतांना दोन ओळींत ४ ते ५ सेमी. अंतर ठेवावे. बियाण्याची खोली २-३ सेमी. ठेवावी. एक एकर लागवडीसाठी २०० ग्रॅम बीयाणे लागते. गादी वाफे नेहमी ओलसर म्हणजे वापसा अवस्थेत ठेवावेत. बियाणे पेरल्यापासून ३ ते ४ आठवड्यांनी पुन्हालागवडीसाठी रोपे तयार होतात.

रोपांची लागवड : लागवड करताना रोपांना ४ ते ५ पाने असावीत. लागवड करताना बरोबर अंतर ठेवून खड्ड्याच्या मधोमध रोप लावावे व दोन्ही हातांच्या बोटांनी दाबावे. आजूबाजूची माती हातानी नीट दाबावी. पूर्ण लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे.

बी पेरणी व रोप लागवडीचा काळ :

बी पेरणीचा काळ रोप लागवडीचा काळफुलांना बहार येण्याचा काळ
जून (मध्य)जुलै(मध्य)पावसाळा(सरताना)
सप्टेंबर(मध्य)ऑक्टोबर(मध्य)हिवाळा
जानेवारी  – फेब्रुवारीफेब्रुवारी- मार्चउन्हाळा

खत व्यवस्थापन : फुलांचे एकसारखे व भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे.

पाणी व्यवस्थापन : झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार  १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत  पिकाला पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामातील पिकासाठी ५  ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

काढणी : झेंडू लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी फुले येतात. झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. फुलांची तोडणी दुपार नंतर करावी. फुले बांबूच्या करंड्यात भरून सावलीच्या ठिकाणी गारव्यात  ठेवावीत.

साठवण : फुले बाजारात विक्रीसाठी पाठवतांना पॉलीथीन पिशव्यांत अथवा पोत्यात भरून पाठवावीत. कटफ्लॉवर्ससाठी ६ ते ९ फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.

उत्पादन: झेंडूच्या फुलांचे एकरी ४ ते ६ टन उत्पादन मिळते. संकरीत जातीची लागवड केल्यास एकरी ६ ते ८  टन उत्पादन मिळते.

आम्ही कोतापूर येथील क्लिनिक च्या आवारात झेंडू व नाचणी ची लागवड करत आहोत. या बद्दल आपण पुढच्या सत्रात (नोव्हेंबर २०२३) चर्चा करूया. 

August 2023

Farm management
Marigold cultivation

Ref.: Marigold cultivation/marigold farming/crop guide, Horticulture: flower crops:: marigold,

सुधारित पद्धतीने झेंडू लागवड ( श्री.सुचित लाकडे),
झेंडू सुधारित लागवड तंत्र(डॉ. विनायक शिंदे-पाटील, श्री. प्रदीप भोर),
आर.सी. एफ. शेतीपात्रिका (ऑक्टोबर २०२१)

Marigold is one of the most commonly grown flowers for garden decoration and extensively used as loose flowers for making garlands for religious and social functions. It has gained popularity amongst the gardeners on account of its easy culture and wide adaptability. Its habit of free flowering, short duration to produce marketable flowers, wide spectrum of attractive colours, shape, size and good keeping quality has attracted the attention of flower growers. In this session we will know about cultivation of marigold.

Climate: Marigold requires mild climate for luxuriant growth and flowering. The optimum temperature range for its profuse growth is 18-20°C. Temperatures above 35°C restrict the growth of the plants, which leads to reduction in flower size and number. In severe winter, plants and flowers are damaged by frost.

Soil: Marigold can be grown in a wide range of soils, as it is adapted in different soil types.  French (Dwarf) marigolds are best cultivated in light soil whereas a rich well drained, moist soils are best suited for African (Tall) marigolds. Sandy loam soil with pH 7 to 7.5 is ideal for its cultivation.

Land preparation: For the main-field, the land should be ploughed well followed by 2-3 harrowing. Mix FYM about 10 to 12 tons per acre and NPK also. The quantity of NPK is given below in manure section. It should be incorporated well to the soil.

Nursery rising: The marigold seeds are black in colour and remain viable for about 1-2 years for rising of seedlings.  Seeds should be sowed in pots, seed boxes or raised nursery beds. Area of beds should be 3*1 m. and height should be 20 cm.  Nursery beds are prepared by digging area and incorporating well rotten FYM and 19:19:19.  Seeds should be sown thinly. Distance between two rows should be 4-5 cm. Seed should be sown at 2-3cm deep in the soil. The quantity of seed required depends upon the level of its purity and germination rate. Generally 200g seed/acre is required for raising the nursery. The nursery beds should be remained moist during entire period. The seed germinate 4-5 days after sowing and seedlings become ready for transplanting after 3-4 weeks for sowing.

Transplanting of seedlings : At the time of transplanting, seedlings should be stocky and bear 3-5 true leaves. Transplanting should be done in well prepared land and soil is pressed around root zone to avoid air pocket. After transplanting, a light irrigation or watering with rose cane should be done. Plant density depends largely upon the growth habit, cultivar and the soil type.

Sowing time and season:

Sowing timeTransplanting timeFlowering seasons
Mid-JuneMid-JulyLate rains
Mid-SeptemberMid-OctoberWinter
Jan-FebruaryFebruary- MarchSummer

Manure and fertilizers: Recommended N:P:K fertilizer dose would be 150:50:50 kg/hectare. Half quantity of nitrogen should be and full of potash and phosphorus should be applied as basal dose, preferably one week after transplanting. The remaining quantity of nitrogen should be one month after transplanting.

Weeding: Weeds are a major problem in marigold especially in rainy season crop. If the weeds are not removed in time, a great loss would occur in terms of growth and productivity of marigold. During the entire growth 3-4 manual weeding are required. Weeding should be done as and when necessary.

Irrigation: Irrigation is done once in a week or as and when necessary. Water stagnation should be avoided. Irrigate the crop in 7-8 days interval, but the frequency and quantity of water also depend upon soil and season. In lighter soil, more frequent irrigation is required than that in heavy soil. In hot summer it requires irrigation after 405 days interval while at 10-12 days interval in winter months. Rainy season crops are irrigated according to the climate. Constant moisture supply is maintained from bud formation to harvesting of flowers.

Harvesting of Flowers : After transplanting plants take 40-50 days to flower.  Loose flowers are plucked when attain full size depending upon the variety. Flowers should be harvested after afternoon. Irrigation before plucking gives better flower quality. Plucking of flowers regularly and removal of dried flowers enhance the yield. For Garland stalk less fully opened flowers (loose flowers) are picked, white for vase decoration also fully opened flowers with stalk are plucked. Loose flowers are packed in a bamboo basket, while flowers with stalk are bunched in bundles and transported to market. From one plant near about 100 to 150 flowers are obtained. Blooming duration is near about 3 months.

Packing: After harvesting, it is better to keep flowers in cool place. The marigolds are packed in gunny bags for local market and for distance market bamboo basket are used.

Yield: Marigolds yield is about 4 to 6 t/acre whereas some hybrid varieties yields 6 to 8 t/acre.

We are cultivating marigold and ragi in the land around clinic at Kotapur. We will discuss about it in the next session (Nov 2023).