ऑगस्ट 2022

 संशोधन

वनस्पतींना रोग कसा होतो व कसा वाढत जातो

कुठलाही रोग एकदम निर्माण होत नाही. टप्प्याटप्प्याने होतो व त्याची लक्षणे दिसू लागतात. ते समजून घेण्यासाठी आपणाला 3 घटकांचा विचार करावा लागेल.

  1. रोग उत्पन्न करणार्‍या जंतूंची रोग उत्पन्न करण्याची क्षमता किंवा ताकद.
  2. वातावरण – रोगजंतूंना पोषक वातावरण.
  3. झाडांमधील प्रतिकारशक्ती.

यापैकी वातावरण व झाडांमधील प्रतिकारशक्ती या घटकांचा विचार आपण नंतर करणार आहोत. या सत्रात आपण रोग उत्पन्न करणारे जंतू व त्यांची क्षमता याबद्दल माहिती घेऊया.

झाडांमध्ये रोग उत्पन्न करणारे जंतू झाडांवरील अन्नावरच जगतात. परावलंबी असे त्यांचे जीवन म्हणता येईल. परंतू त्यातील सगळेच काही रोग उत्पन्न करीत नाहीत. रोगाला कारणीभूत असणार्‍या असंख्य रोगजंतूंपैकी काही ठराविकच विशिष्ट वातावरणात, विशिष्ट जातींच्या झाडांमध्ये रोग निर्माण करतात. उदा. फंगस (अळंबी, बुरशी इ.), बॅक्टेरिआ (विशिष्ट जातीचे रोगजंतू), अलगी (शेवाळ), एकपेशीय प्राणी (Protozoa) व्हायरसेस अशा जीवसृष्टीतील विविध प्रकारच्या जंतूंनी झाडे रोगग्रस्त होतात.

रोग उत्पन्न होऊन त्याची लक्षणे दिसू लागेपर्यंत कायकाय घटना घडतात ते थोडक्यात बघूया.

रोगकारक जंतू हे वारा, प्राणी, कीटक यांच्या माध्यमातून झाडांवर येतात. काही वेळा ते मातीतूनही येतात. मूळे, खोड, पाने, फुले, फळे यामधील कुठल्याही भागात रोग होऊ शकतो. त्या भागातील प्रतिकारशक्ती व जंतूंची जात व क्षमता यावर ते अवलंबून असते. त्या भागाशी संपर्क झाला की काही रासायनिक क्रियांमुळे त्या जंतूंना तेथेच चिकटून राहणे शक्य होते. त्याची पुढची पायरी म्हणजे झाडांवरील जखमी भागांमधून किंवा नैसर्गिक वाटांमधून (उदा. पानांवरील छिद्रे) रोगजंतू आत प्रवेश करतात. काहीवेळा झाडांमधील नैसर्गिक प्रतिकारशक्तीमुळे त्यांचा नाश होऊ शकतो. परंतू नाहीतर ते रोगजंतू त्या त्या भागातील पेशींवर हल्ला करतात. त्यानंतर रोगाची लक्षणे कमीअधिक प्रमाणात, कमीजास्त कालावधीत दिसू लागतात. हा कालावधी काही दिवसांचा किंवा काही आठवड्यांचा असू शकतो. पेशींवर हल्ला केल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रियांमुळे पेशीकार्य बिघडते. काहीवेळा पेशी मरतात. झाडांपासून अन्न घेतल्यानंतर रोगजंतूंची पुर्ननिर्मिती होते. जास्त प्रमाणात पुर्ननिर्मिती झाली तर  झाडांचा तो भाग अथवा संपूर्ण झाड मारू शकते.

पुढील सत्रात आपण या रोगजंतूंचा झाडांच्या शरीर कार्यावर काय परिणाम होतो ते अभ्यासूया.

August 2022

Research

Disease in plants: How it starts and spreads

No disease comes suddenly. It occurs in stage and at particular time of development one can see the symptoms of disease. Three factors are to be considered.

  1. The strength of disease producing organisms.
  2. Environment – If it is favourable then the spread will be faster.
  3. The immune mechanism in the plant.

In this session we will study the organisms as disease producing agents.

The organisms which cause diseases in plants grow on the food prepared by plants. In that sense they are dependent on plants to survive. One must remember that many of these organisms do not produce disease. Out of thousands of such creatures only a handful of them in favourable environment cause disease in certain variety of plants. For example, Fungi, Bacteria, Algae, Viruses etc.

Let us see what happens when such organisms attack plants.

Air, insects and certain other animals are the vehicles through which infective germs travel to plants. Roots, stems, leaves flowers, fruits can be attacked to produce disease in that location. It all depends on the immunity present in that part of plant. The type of infection is also a deciding factor. subsequent to coming in proximity of the plant, the germs produce chemicals facilitating them to stick to the site. Next stage is of entry to the inside tissues of plants through numerous tiny holes especially on leaves. It is possible that with strong immune response from the plant the germs are killed. If not, they attack the plant cells and sooner or later the disease symptoms are seen. It may be days to weeks. Over a period of time, the cells become functionally or structurally incompetent and may die. In that case a part or sometimes whole plant can die.

In the next session we will study in detail the changes occurring in functions of the plant due to disease.