जुलै 2022

संशोधन

वनस्पतींचे पुनरुत्पादन

मागील जूनच्या सत्रात आपण वनस्पती वातावरणातील व जमिनीतील पाणी, मुलभूत द्रव्ये, सूर्यप्रकाश, हवा यांच्या सहाय्याने त्यांचे अन्न कसे तयार करतात, तसेच वनस्पतीच्या सर्व भागात म्हणजे मुळांपासून ते शेंड्यापर्यंत ते कसे पोहोचविले जाते ते पाहिले. पुनरुत्पादन म्हणजेच पुर्ननिर्मिती हे जीवंत सृष्टीचे एक वैशिष्ट्य आहे. नर व मादी यांच्या मिलनातून ते घडते हे आपण पाहतोच. मनुष्य प्राण्याप्रमाणेच पक्षी व प्राणी यांच्यातही असेच घडते ते आपल्याला माहिती आहेच. वनस्पतींमध्ये ही क्रिया कशी होते ते पाहणे मजेशीर आहे. त्या संबंधीची माहिती या सत्रात घेऊया.

वनस्पतींमध्ये [1] लैंगिक व [2] अलैंगिक या दोन पद्धतींनी पुनरुत्पादन होते.    

[1]   लैंगिक पद्धत

फुलाचे 4 मुख्य भाग असतात –

(1) पाकळ्या   (2)  निदलपुंज    (3)  नर भाग     (4) मादी भाग

परागकोष व परागकोषाचा देठ यांचा नर भाग बनतो. तर कुक्षी, कुक्षीदेठ व अंडाशय यांनी मादी भाग बनतो. या खेरीज परागकण, परागनलिका व बिजांड हे पुनरुत्पादन म्हणजेच प्रजनन क्रियेतील महत्वाचे भाग आहेत. या प्रत्येक भागाची माहिती व त्यांचे कार्य काय असते ते पाहुया.

पाकळ्या (1) – फुलांच्या पाकळ्या विविध रंगांच्या असतात. त्या फुलाच्या आतील भागाचे संरक्षण करतात. पाकळ्यांच्या रंगामुळे व सुगंधामुळे कीटक, पक्षी आकर्षित होतात.

निदलपुंज (2) – कळ्यांच्या खालचा सर्वात बाहेरचा भाग म्हणजे निदलपुंज. हा भाग फूल कळी अवस्थेत असतांना आतील भागांचे संरक्षण करतो. निदलपुंज बरेचदा हिरव्या रंगाचा असतो.

नर भाग

परागकोष (3) – परागकोषामध्ये परागकण तयार होतात. परागकण नर भागाकडून मादी भागाकडे म्हणजेच कुक्षीकडे (5) जातात. कुक्षीकडे परागकण नेण्याचे काम वारा, पाऊस, किटक व पक्षी यांच्यामार्फत होते.

परागकोषाचा देठ (4) – हा परागकोषाला आधार देतो.

मादी भाग

कुक्षी (5) – फुलाच्या मध्यभागी लांब नळीसारखा (बहुतेक वेळेस हिरवा) भाग असतो. त्याच्या टोकाकडील फुगीर भाग म्हणजेच कुक्षी (फुलाचे गर्भाशयच म्हणाना). कुक्षी चिकट असते त्यामुळे परागकण कुक्षीवर आले की पराग कणांची रासायनिक क्रिया होऊन ते अंकुरित होतात. त्यांच्यापासून पुर्ननिर्मिती करणार्‍या 2 पेशी, पेशीबाहेर 1 वेगळे केंद्रक व 1 लांब नळी म्हणजेच परागनलिका (9) तयार होते. या परागनलिकेतूनच 2 नवीन पेशी व 1 केंद्रक वाहून अंडाशयामध्ये नेले जातात.

कुक्षीचा देठ (6) – परागनलिकेच्या बाहेरचा नळीसारखा भाग कुक्षीच्या खाली सुरू होऊन अंडाशयापर्यंत पोहोचतो. याला देठ म्हणतात. या देठाच्या आतील भागातून परागनलिका अंडाशयाच्या आतपर्यंत पोहोचते.

अंडाशय (7) – कुक्षीच्या देठाच्या सर्वात खाली असणारा अंड्याच्या आकाराचा फुगीर भाग म्हणजे अंडाशय. याच्या आत अंडपेशी असलेले बीजांड (10) असते.

पुर्ननिर्मिती कशी होते? – परागनलिकेने वाहून आणलेल्या पुर्ननिर्मिती करणार्‍या 2 पेशींपैकी एका पेशीचे बीजांडातील अंडपेशी बरोबर मिलन होते. या मिलनातून नवीन पेशी (नवीन जीव) तयार होतो.

थोडक्यात सांगायचे तर मादी भागातील अंडाशय, त्याच्या आत असलेल्या  बीजांडामध्ये नवीन तयार झालेली पेशी म्हणजेच नवीन जीव असतो.

पुढे अंडाशयापासून फळ तयार होते व बीजांडापासून बी तयार होते. त्याचवेळी फुलाचे इतर भाग गळून पडतात. नंतर फळ फुटून जमिनीवर पडते व अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. या बीच्या आत नवीन जन्माला आलेली पेशी असते. बी मधल्या पोषक द्रव्याचा वापर करून या नव्या पेशीची वाड होते व त्यापासून नवीन रोपटे तयार होते.

[2]   अलैंगिक पध्दत

पुर्ननिर्मितीच्या या पध्दतीत वनस्पतींमध्ये एकाच पेशीचे विभाजन होऊन पुर्ननिर्मिती होते.  आपण मार्च महिन्यातील सत्रात संशोधन भागात जनुकाबद्दल (Gene) माहिती दिली होती. त्यामध्ये आपण पाहिले होते की जनुक म्हणजे एकमेकांची प्रतिकृती असणार्‍या एकमेकांना जोडलेल्या दोन साखळ्याच जणू. या दोन साखळ्या अगदी तंतोतंत एकाच प्रकारच्या रसायनाने बनलेल्या असतात. जनुकाची खालील आकृती पहा –         

ज्या वनसपतींची निर्मिती मिलनाशिवाय होते त्या वनस्पतींमध्ये एका पेशतील जनुक विभागले जाते व एक सारख्या दोन पेशी (जनुकाच्या तंतोतंत एक सारख्या साखळ्या) तयार होतात. त्या 2 पेशींपासून पुढे 4 व नंतर चाराच्या 8 अशा रितीने त्यांची वाढ होते.

बटाट्याचे उदा. पाहुया. बटाट्यावर डोळे असतात व बारीकसा अंकुर असतो. आपण बटाट्याचे डोळे किंवा अंकुर कापून जामीनीत टाकतो तेव्हा वरती सांगितल्या प्रमाणे त्या मधील पेशींची वाढ होते व बटाटा तयार होतो. त्यालाही डोळे व अंकुर असतात. रताळे, शैवाल, नेचे या सारख्या वनस्पतींमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पुर्ननिर्मिती होते.

अजून एक नेहमी पाहण्यात येणारे उदा. पाहुया. आपल्या शेतात भराभर वाढत जाणारे गवत, तण हा एक मोठ्ठा प्रश्र्न असतो. त्याची वाढ या दोन्ही प्रकारे होऊ शकते. काही गवताच्या जातींना फुले येऊन त्याची पुर्ननिर्मिती होते तर गवताच्या काही जाती दोन्ही प्रकारे वाढू शकतात.

July 2022

Research

Plant Reproduction

In the last session we studied how the plants prepare food by using water, inorganic matter, sunlight and air. We also discussed how the food reaches to leaves, stem and up to the tip of the plant.

Reproduction is a peculiar quality of living world. Sexual contact between male and female occurs during this process. We observe it in birds, insects and animals including human being. Let us examine the way it occurs in the plants.

Look at the figure below wherein the parts of a plant participating in reproduction are shown.

A flower has 4 main parts –

  1. Petals  
  2. Calyx
  3. Androecium (male) consisting of Anther and filament 
  4. Gynocem (female) consisting of stigma, style, ovary

Pollen grains, pollen tube and ovule are other important parts essential in reproduction. We will study the structure and function of each part.

  1. Petals – Petals have different colours. Besides protecting inner parts of flowers, the colour and odour emanating from petals attract birds and insects. They help in dissemination of pollens.
  2. Calyx – The lowermost part of bud is called calyx. It protects the bud. Most often it is of green colour.
  3. Androecium – i.) Anther – Here pollens are formed. From this place they travel to stigma. Wind, rain water, birds are responsible for this operation. ii. )Filaments – It supports anther.
  4. Gynoceum – In the centre of the flower one can observe a long tubelike structure. Generally, it is of green colour. It is called stigma. (Uterus of plant!) Stigma is sticky. When pollens fall on it, series of chemical reactions occur giving rise to 2 cells (male gametes). They are carried to ovules (female gametes) through the tube. A new cell is formed through fertilization. It is covered by embryo sac which give rise to fruit while inside fertilized ovule form seed. Seed, when fallen on the ground, germinate under suitable condition to give riles to a new plant.

Asexual reproduction – Besides the usual reproduction through fertilization of male and female gamets, in plants asexual reproduction occurs. We have already studied genes where in the two strands are joined together in such a way that they become mirror images of each other. In asexual reproduction the two strands get separated and from each strand a new cell is formed. In this way 2 ,  4,   8 ,  16 cells are formed giving rise to a new plant.

For example – On potatoes one can notice small depressions. It is a group of cells. When il is put in soil it gives rise to potato plant with underground potatoes. Sweet potatoes, Moss are other examples having asexual reproduction.

One common example is grass in the garden or farms. It grows so fast that lt becomes a problem of eradicating it. There are number of different varieties of grasses. Sexual, asexual or both — any of these methods are adopted by different types of grasses.