जुलै 2022

पूरक विचार

दोन दृष्ये

दृष्य पहिले

गावाला आलो की घरापासून मैलभर अंतरावर असलेल्या एका झाडाखाली स्वस्थ बसणे हा माझा आवडता छंद. अशावेळी बदलत जाणार्‍या आयुष्याबद्दच्या विचारांची गर्दी मनात होते. त्या दिवशी असाच बसलो होतो तर समोरच्या डोंगरावर एक वेगळेच दृष्य दिसले.

तसा तो डोंगर म्हणजे जास्त करून कातळ व थोडीशी झाडे असाच आहे. डोंगराच्या एका बाजूला 3-4 एकर जागेवर गडगा घातलेला दिसला. 15-20 तरूण-तरूणीं चा गट तेथे काहीतरी करत होता. त्या जागेत लहान मोठ्ठी झाडे लावलेली दिसत आहेत. एका मोठ्ठ्या दगडी भोवती 4-5 तरूण उभे राहून आळीपाळीने पहारीने त्यावर घाव घालून त्याचे बारीक दगड करतांना दिसत आहेत. काही तरूणी ते बारीक दगड उचलून झाडाभोवती गोलाकार अळी करत आहेत. काहीजणी माती व खत आणून झाडांच्या बुंध्याशी घालत आहेत. अधूनमधून त्यांच्या गप्पा चालल्या असाव्यात. काही शब्द कानावर येतात त्यावरून त्यांनी लावलेली झाडे, पाऊस, झाडांचे रोग असलेच विषय असावेत. 3-4 तासांनी जेवणाची वेळ झाली असावी. सर्वजण एका तात्पुरत्या उभारलेल्या छपराखाली आले. प्रत्येकाने डबे उघडले. त्यांच्या गप्पा रंगात चालल्या आहेत. एकजण 2 दिवसांपूर्वी बघितलेल्या नाटकाबद्दल बोलतो आहे. एक मुलगी वर्तमान पत्रात शिक्षणाबद्दल आलेल्या लेखातील माहिती देत आहे.

4-5 दिवसांनंतर रविवार आला. त्या दिवशी साकाळी मात्र तेथे शुकशुकाट दिसला. संध्याकाळी मात्र परत तो गृप तेथे जमलेला दिसतो आहे. नाच, गाणी, खेळ असे चालले आहे. काळोख पडायची वेळ झाल्यावर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत.

चौकशी करता कळले की ही सर्व मंडळी येथीलच आहेत. येथेच राहून शेती करून पैसा मिळवायचा अशा निर्धाराने एकत्र आली आहेत. त्यासंबंधी त्यांची योजना तयार आहे. पैसा मिळवणे व खर्चालाही कात्री लावणे अशा दोन्हीचा विचार त्यामध्ये आहे असे कळले. काय आहे ती योजना? पुढील सत्रांतून विचार करुया.

दृष्य दुसरे

दादरला घरी जायचे म्हणून घाईघाईने विरार स्टेशनवर पोचलो. सकाळी 8-10 ची गाडी सुटायला तशी 5 मिनिटे होती. पण डबा आधीच भरलेला होता व गाडी पकडायला सर्वजण डब्यात घुसत होते. मीही त्या लोंढ्याबरोबर आत ढकलला गेलो. स्त्रियांच्या डब्याला लागून असलेला डबा होता. एक तरूण, आताच गाडीत चढलेला, मान उंच करून पत्नी डब्यात चढली का नाही बघत होता. हातानेच खुणा झल्यावर तो स्वस्थ झाला. पत्नी माहिमला घरकामाला, तर हा तरूण दादरला एका ऑफीसमध्ये असे कळले. त्या 4-5 जणांचा एक गृपच असावा. एक चर्चगेटला जाणारा. खाजगी कंपनीत ऑफीसमध्ये नोकरी. मित्रांना सांगत आहे – नवीन साहेब आले आहेत, फार कडक. दर मिनिटाला 10 मिनिटे लेट अशा रीतीने त्यांचे गणित. तेवढी पगार कपात. दुसरा बाईकवरून झटपट कुरिअर पोहोचविणारा. 2 दिवसांपूर्वी घाईने पोचायचे म्हणून सिग्नल तोडून गेला, तो गाडीचा धक्का लागला. कपाळावर अजूनही पट्टी दिसत आहे. त्याचा मित्र म्हणतो – बरा वाचलास. हॉस्पिटलची गरज नाही भासली. माझ्या मुलाचे पोट दुखू लागले म्हणून रात्री हॉस्पिटलमध्ये नेले. अपेंडिक्सची शंका म्हणून सगळ्या तपासण्या. खरे तर पोट दुखायचे तोपर्यंत थांबलेच होते. 10 हजाराचे वर बिल. त्यातच आता गणेशोत्सव येणार. 4-5 मंडळांचे कार्यकर्ते येतात पावत्या-पुस्तके घेऊन. त्यातील एकजण आय.टी. कंपनीतला दुजोरा देत म्हणतो – आम्ही जरा बर्‍या सोसायटीत राहतो. 200 रुपयांची पावती आधीच नांवावर करून आणतात. आधीच रात्रभर जागून काम असते व सकाळी यावे तर यांची ब्याद. तेवढ्यात एका कोपर्‍यात गलवला ऐकू येतो. जागेवरून भांडण. बघून घेईन, बाहेरून येऊन माजले आहेत. अशी वाक्ये कानावर येतात.

ही सर्वजण खेड्यातून शहराकडे धावलेली मंडळी आहेत. घरकाम, ब्युटीपार्लर, वॉचमन, थोडेफार शिक्षण असेल तर ऑफीसमध्ये नोकरी. रोजची गाडीची गर्दी, 10-12 तास काम, सकाळी घर सोडले की रात्री कुटुंबाची भेट, मुले झोपलेली किंवा टी.व्ही. बघत. प्रदुषणयुक्त हवेने आजारपणे, मुलांची शिक्षणे या सगळ्यात पैसा जातो. परंतु शारीरिक श्रम नकोत, छानछोकी अशा हव्यासापोटी शहरात आलेली. 10*12 च्या खुराड्यात राहतात. जीवन जगतात, जगतात कसले ओढत असतात. अशी ही 2 दृष्ये. कसे जगावे हे प्रत्येकाने ठरवावे. पुढील सत्रतातून आपण खेड्यातील तरूण तरूणींच्या गटाबददल चर्चा करणार आहोत.

July 2022

Supportive Thinking

Two Scenes

Scene 1

Whenever I visit my village, in the morning I go to a nearby place with a huge banian tree. I spend quite some time over here thinking of fast changing today’s life. This time while sitting there I saw something different on the hill just opposite side.

The hill is rockier with few trees here and there. There was a compound stone wall surrounding 3-4 acres area. Around15 to 20 young boys and girls were doing something over there. Few boys were cutting a big size stone by hammering it with an iron rod. Girls were putting the small pieces of stones around planted trees. Others were putting soil to provide nutrition and support to the trees. They were talking amongst themselves. From few words, which I could hear, I could make out that the talk was related to plantation, rain, plant diseases etc. After 3-4 hour all of them gathered near a temporary shed. Everyone opened his tiffin. While enjoying eating food the talk was on different subjects. Someone was talking about drama he saw recently; one girl was describing how one author has written on education etc.

Next day happened to be Sunday. I went there thinking that I will go there and talk to them. No one was there. I went there in the evening again and saw that the group has assembled again. They were dancing, playing and enjoying the Sunday evening. Inquiring with local people revealed that most of them are graduates and even post graduates. The group has been formed with determination to earn their livelihood through agriculture. They have a plan of doing it. We will talk on some of the problems related to this subject in the next session.

Scene 2

The other day I was at Virar. To return at my Dadar residence, I reached Virar station around 8 in the morning. The train was to leave at 8-10. It was already full and many people were hurriedly going to enter into the already crowded compartment. I was also pushed inside one compartment by the crowd. A young person by my side was desperately looking at ladies’ compartment to see whether his wife could get in. He saw her, raised his hand and appeared to be relieved. She was working as cook.

at 3-4 places while he was a peon in the office. Then he started talking with others. It appeared that there was a group of these young and middle-aged working-class individuals travelling in the same compartment of this train every day. One of them started describing how his boss is very strict. Even if late by few minutes he converts it into hours and salary cut accordingly. “His wife must be argumentative and he ventilates out his anger on you people” his friend said jokingly. One boy had plaster on his wrist. He was in courier company. To reach the customer on time, he broke the signal rule and was hurt by a vehicle. His friend said “You are lucky. There was no need of hospital visit”. His son had pain in the abdomen and was taken to a nearby nursing home. After medication the pain subsided. Even then he was subjected to blood test, sonography etc. with a bill of around Rs. 10,000/-. Other fellow, probably staying in upper class society was working in I.T. He said “Now Ganpati festival is coming. Coming home after might duty the young boys from different organizations come for donation. They already write Rs. 200 to 300 on the receipt with my name. The gift of staying in this society!  In the meantime, there was commotion in one corner of the compartment. It was quarrel between 2 groups. “Will see you, coming from outside and talking like this?” and such was the language with shouting and abusing.

Most of them have come to city from their villages. Rickshaw driver, watchman, office peon, courier and many such services are the earning sources for them. Leaving house by 7 AM, crowded train, long office hours, returning home by 8-9 PM is their routine. Polluted atmosphere providing fertile ground for illness, children’s education, old aged parents, it becomes difficult to meet two ends at the end of the month.

City or village life? One has to choose. In subsequent sessions we will touch upon other aspects of life.