जुलै 2022

शेती व्यवसाय व्यवस्थापन

फलोत्पादन

कोकण कृषी विद्यापीठ स्थापन झाल्यापासून कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे ध्येय समोर ठेवून त्याप्रमाणे फलोत्पादनावर भर देण्यात आला. परंतू अनेक कारणांनी तसे झालेले आढळत नाही. अजूनसुद्धा अभ्यासूवृत्तीने याकडे लक्ष दिल्यास ठरलेले ध्येय गाठता येईल. या सस्रात आपण कोकणात कोणती फळे मुबलक किंवा कमी प्रमाणात होतात, त्यांची उपयुक्तता किती व  त्यांपासून अर्थोत्पादन कसे करता व मिळवता येईल याचा विचार करणार आहोत.

  1. आंबा – कोकण हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असले तरी येथे अनेक प्रकारच्या आंब्यांच्या जाती नैसर्गिकरित्या किंवा संकरित केलेल्या होऊ शकतात. लोणचे, मुरांबा, जॅम, आंबापोळी, या व्यतिरिक्त अन्न प्रक्रियेद्वारे अनेक प्रकारची उत्पादने करता येऊ शकतात. त्यांना बाजारभावसुद्धा चांगला मिळू शकेल.
  2. काजू – कोकणात काजूसुद्धा मुबलक प्रमाणात होतो. त्यापासून विविध उत्पादने होऊ शकतात. सध्या कोकणात शेतकर्‍यांनी काजू व हापूस आंबा यांच्या लागवडीवर खूप भर दिलेला आढळतो. परंतू मागील 4-5 वर्षात विविध रोगांमुळे आंबा व काजूच्या उत्पादनात घट झालेली दिसते.
  3. फणस – येथे कापा फणसापेक्षा बरका फणस मुबलक प्रमाणात होतो. फणसाच्या गर्‍यांपासून बनवलेले तळलेले गरे, गरे पीठ, फणसपोळी इत्यादिंना मागणी असते.
  4. कोकम – मुबलक प्रमाणात फळे देणारा वृक्ष. कोकमचे आगळ, कोकम सरबत, सुकलेले कोकम (आमसुले) यांना चांगली मागणी असते.
  5. आवळा – साधा मोठ्ठ्या जातीचा व गावठी असे आवळ्याचे दोन प्रकार असतात. पैकी गावठी आवळा औषधी असतो. काळजीपूर्वक लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. आवळ्यापासून लोणचे, सरबत, कॅंडी, सुपारी, मोरावळा (गावठीपासून) असे पदार्थ बनविता येतात.
  6. जांभूळ – जांभळाचे उत्पादन मुबलक होऊ शकेल. औषधी उपयोगाशिवाय जॅम, जेली, सरबत या सारखे पदर्थ बनविता येतात.
  7. करवंद – पिकल्यावर गडद जांभळ्या रंगाचे दिसणार्‍या, “कोकणचा रानमेवा” म्हणवून घेणार्‍या या फळांची लागवड केल्यास करवंद मुबलक प्रमाणात होऊ शकेल. त्यापासून सुकवून मनुका बनविता येतात. कोकण कृषी विद्यापीठाने मोठ्ठ्या आकाराची जात संकरित केली आहे. त्याच्या उपयुक्ततेवर प्रयोग करावे लागतील.
  8. अननस – कोकणसारख्या खडकाळ प्रदेशातही अननस होऊ शकतो. त्या पासून विविध उत्पादने घेता येतात, परंतू प्राण्यांच्या उपद्रवामुळे  मोठठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणे कठीण होते.

इतर फळे – कलिंगड, लिंबू, केळी, चिकू, पेरू, सीताफळ, रामफळ, पपई, पपनस, महाळुंग, पांढरा जाम, चारोळी, नारळ, सुपारी, डाळींब, चिंच यासारखी फळे कोकणात होऊ शकतात. त्याची उपयुक्तता, बाजारभाव, विक्री इत्यादी संबंधी शेतकर्‍यांना शिक्षण  द्यावे लागेल.

पुढील सत्रात आपण फुलझाडे व भाजीपाला या बद्दल विचार करुया.

 July 2022

Management of Agriculture

Horticulture

Since independence, attempts are made to make Konkan like California, meaning accent on horticulture. Although a distant dream, even today with proper planning supported by relevant knowledge we can achieve it. In this session we will study the fruits which can be grown in the area, availability of it from the stand point of revenue generation.

  1. Mango – Kokan is famous for Alphanso. But different varieties of mangoes, natural and hybrid, can be grown here. Pickle, Muramba, Jam, Chunda and many such products can be prepared from mangoes. Generally, the demand is good for most of them.
  2. Cashew – Next to mango, growing cashew is seen in huge quantity. Number of products are available made from cashew nuts. Over the last 4-5 years it is observed that a particular type of infection has become troublesome for mangoes and cashews.
  3. Jackfruit – Pulpy variety is more as compared to less water content variety (Kapa in local language) in this region. Fried items, flour from dried fruits, Phanas Poli are the preparations.
  4. Kokam –The plant gives sufficient number of fruits. Agal, Juice, dry kokam (to be used in cooking) can be made for sale.
  5. Amla – Amla (avala in local language), we find 2 varieties. Local variety – small in size but rich in medicinal value. Bigger size also can be grown. Morawala, candy, pickle etc. are the preparations.
  6. Jamun – Jamun (Jambhul in local language) is supposed to be good for diabetes. Jam, jelly etc. can be prepared.
  7. Karvand – When ripe it looks like small black or reddish black grapes. It can be cultivated in abundance. Similar to dried grapes i.e. resins, Karvand in dried form can be prepared. Kokan Krishi Vidyapeeth has made a hybrid variety having bigger fruits. One can try juice and other preparations from this variety.
  8. Pineapple – Pineapple can be easily grown wherever water supply is there. Underground small animals like Mongoose become problematic. Muramba, juice can be easily made.

Other fruits – Pumkin, lemon, chikko, guava, sitaphal, Ramphal, papai, papanas and Mahalung (Juicy fruits); Charoli, Coconut, Betalnut, Anar (Dalimb in local language, Tamrind etc. can be planted with adequate care. We need to work on these fruits from the standpoint of revenue generation.

In the next session we will talk on vegetables and flowers in Kokan region.