जून 2022

पूरक विचार

मनाची वाढ

मागील सत्रात मन म्हणजे आपल्या मेंदूतील विचारांचा जणू संग्रहच असे आपण बघितले. लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत शरीरात जसे बदल होतात, तसेच मनामध्येही होतात. त्यालाच मनाची वाढ असे म्हणता येईल. आपण मुलांपासून सुरुवात करुया.

जन्मल्यापासूनची पहिली 6 वर्षे –

      मूल जन्माला आल्यावर त्याचे मनात काय विचार असतात याचे उत्तर देणे कठीण आहे. मुलाला पहिला स्पर्श आईचा होतो. आई त्याला दूध देते असे लक्षात घेतले तर तो स्पर्श, भूक लागल्यावर दूध मिळणे व आईची मूर्ती हे एकत्रितपणे त्याच्या मेंदूत साठविले जाते. प्रेमभावनेची ही सुरुवात. पुढे समजा दूध मिळायला उशीर झाला किंवा आई रागावलेली असली तर भीती, राग अशा वेगवेगळ्या भावना मनामध्ये निर्माण होतात. सुरवातीचे वय असे भावना शिकणारे असते. याच वयात त्याला आजूबाजूच्या जगाची ओळख होते. भिंतीवरील पंखा दिसतो, उडणारी चिमणी दिसते, असे अनेक. या सर्व घटना त्याच्या स्मरणशक्तीत प्रतिमेच्या रूपात असतात. मूल 1-2 वर्षांचे झाले की भाषा शिकायला त्याची सुरवात होते. भिंतीवरील गरगर फिरणारा पंखा, तर चिवचिव करीत जाणारी चिमणी असे शब्द त्याच्या कानावर येतात. थोडक्यात भाषेमुळे त्याचे भावनामय विचार व कल्पनाशक्ती समृद्ध होते.

6 वर्षे ते तरूणपणापर्यंत –

      सर्वसाधारणपणे 6 वर्षानंतर मूल शाळेत जाते. गणित, भाषा, इतिहास, चित्रकला असे अनेक विषय त्याला शिकविले जातात. हे सर्व विषय म्हणजे आजूबाजूचे जग जाणून घेण्याचा विचारांचा खजिनाच म्हणायला हवा. पण ते शिकवितांना विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय लागावी असा त्याचा हेतु असतो. सध्यातरी नुसते पाठ करून मार्कस् मिळविणे असे झाल्याने मुलांची विचार करण्याची शक्तीच खुंटते असे दिसते. त्यासाठी अनौपचारिक शिक्षणाचा प्रयोग करता येईल. समाजातील काही जबाबदार मंडळींनी हा प्रयोग करावा. काही ठराविक वयोगटातील मुलामुलींना वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचून दाखविणे, चर्चा करायला लावणे, हळूहळू त्यांनाच गृपमध्ये वाचायला शिकविणे अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल.

तरूण मुले-मुली व त्यांचे पालक –

      तरूण मुलांवर 2 प्रकारची जबाबदारी असते. शिकणे व आपण ज्या क्षेत्रात काम करणार आहोत त्यामध्ये काम करून बघणे. येथील मुख्य उत्पादनाचे साधन शेती उत्पादन व त्यावर प्रक्रिया करून होणारी उत्पादने – खाद्य पदार्थांपासून ते औषधांपर्यंत तयार करणे हे आहे. त्याला पूरक असे अनेक व्यवसाय येतात. उदा. शेतीपंप दुरुस्ती, रोपवटिका, खते उत्पादन व्यवसाय व असे अनेक. शेती दवाखान्याच्या शिक्षणक्रमात या सर्व विषयांचा समावेश आहे.

      तरूणांच्या गृपबरोबर ज्यांनी संसाराला सुरवात केली आहे अशा पालकांनीही एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण घ्यावे. जागतिकीकरणामुळे अनेक बदल एवढ्या वेगाने होत आहेत की त्याची माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे. नियमित वाचनाचे कार्यक्रम, ग्रंथालये याद्वारे अशी माहिती मिळविता येईल. लघुकथा, वेगवेगळ्या विषयांवरील लेख अशा विषयांवरील वाचन/चर्चा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे करमणूक व शिक्षण अशा दोन्हीही गोष्टी साध्य करता येतील.

मध्यम वय व वृद्ध –

      साधारणपणे 50 वर्षांच्यापुढे जीवनात असा एक टप्पा येतो की मुले मोठ्ठी होऊन स्वतंत्रपणे त्यांचे आयुष्य जगण्याच्या मागे असतात. काही वर्षाँनी आपली शारीरिक व मानसिक क्षमता कमी होणार असे वाटून वृध्दत्वाची चाहूल थोडीफार अस्चस्थ करीत असते. 65 ते 70 च्या पुढचा वयोगट हा वृध्दावस्थेत असतो. या वयातील स्त्री-पुरुषांनी एकत्रित जमून मुलाबाळांना सल्ला व उरलेल्या वेळात समाजस्वास्थ्यासाठी काय हातभार लावता येईल यावर चर्चा करावी व तसे कार्यक्रम आखावेत. वाचनालय, हॉस्पिटलमध्ये पेशंटना मार्गदर्शन, सार्वजनिक स्वच्छता, तसेच पाणी, तंत्रज्ञान, उद्योग अशा  अनेक प्रकारच्या माहितीची समाजाला गरज असते. त्या त्या  विषयातील तज्ञांना याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी त्यामध्ये सहभागी होता येइल.

सारांश –

      निरोगी मनासाठी विचारक्षेत्र कसे बदलत जाते हे वर वर्णन केले आहे. सारांशाने असे म्हणता येईल की भावना व बुध्दी यांचा तोल संभाळून स्वतःच्या, कुटुंबियांच्या, समाजाच्या सुखासाठी विचार करणे व काम करणे म्हणजेच आपल्यातील आत्मशक्तीचा किंवा ईश्र्वराचा शोध घेणे व समाधानी जीवन जगणे असे म्हणता येईल.

June 2022

Supportive Thinking

Mind Development

In the last session we defined mind as collection of thoughts in our brain. From childhood till old age the changes occur in the functioning of organ systems in our body. Similarly the thinking and the resultant thoughts also change over a period of time.

First 6 years of life –

What new-born child might be thinking is difficult to answer. The first contact is with mother while breast feeding. The taste of milk, mother’s touch , her face are all engraved on child’s mental frame as an image. The beginning of love as an emotion might be the starting point with this imagery. Imagine now that due to some reason mother is angry or feeding time gets delayed, feeling of anxiety, irritability are likely to occur. Thus, in early years of life emotive component of mind dominate the thought process, Later on child comes in contact with the world around. Flying sparrow making noise, fan on the wall and many such images get impinged in the memory store. After about an year when child learns words and the sentences thought process takes a different turn. Imagination coupled with emotions make a distinct mark on his mind.

6 years to young age –

After 6 years when child enters school, acquaintance with mathematics, history, drawing and such subjects become the vehicle to get connected with larger canvas of the world around. Ideally the subjects are to taught in a way that child learns to think. Unfortunatly , rote learning in the education today becomes an obstacle to this process, Marks and money become synonymus and becomes a complex problem in education.

Non formal education is one of the experiments to address this issue. Responsible citizens can take a lead to start such self learning centres. Reading on various subjects, group discussions, debates and later on supporting activities will enhance the process.

Youths and parents –

Period of puberty and later years is a transition zone in one’s life. Self identity occurs at this age with future responsibilities. Which is my field to earn? Which course I should join ? such questions occupy their mind. In villages agriculture and related activities become the major sources for livelihood. For ex. One can start food products business, articles from bamboo etc. supporting to it can be electrical, mechanical engineering services . these are all besides the main field of agriculture.

Those who are married need to move along with changing world. Library, reading groups and such activities represent ways by which one becomes knowledgeable about the current changes.

Middle age and old age –

Around 50 years of age a turning point comes in one’s life. Children are settled in their family life. Physical and psychological changes occur  and become more noticeable by 65 years onwards. It’s a good idea to come together and start some social activities.

In brief –

To maintain emotional and intellectual balance while discharging our duties to self ,family and society means the realization of Self, the God within us.