नोव्हेंबर २०२३

शेती व्यवसाय व्यवस्थापन

झेंडू लागवड

ऑगस्ट २०२३ च्या सत्रात नमूद केल्याप्रमाणे या सत्रात आपण ए.आर.एच. च्या कोतापूर केंद्रातील दवाखान्याच्या आवारात केलेल्या झेंडू लागवडीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

दवाखान्यासामोरील सव्वा दोन गुंठे जमिनीवर झेंडूची लागवड केली आहे. सर्वप्रथम ९ जून या दिवशी ही जमीन व्यवस्थित नांगरून घेतली. नांगरल्यानंतर त्या जमिनीवर १२० किलो शेणखत सर्वत्र पसरले व ते मातीत व्यवस्थित मिसळण्यासाठी पुन्हा नांगरणी केली. यामुळे जमिनीतील माती चांगली भुसभुशीत होण्यास मदत झाली. नांगरणीनंतर १५ जून ला आफ्रिकन मेरीगोल्ड डबल ऑरेंज या जातीचे झेंडूचे बियाणे या जमिनीवरील एका कोपऱ्यात पेरले. बी पेरल्यानंतर ८ -१० दिवसांनी (१५ जून च्या सुमारास) ते रुजून आले व त्यातून छोटी रोपे तयार झाली. रोपांच्या चांगल्या वाढीसाठी ८ जुलैला १०० ग्रॅम युरिया हे खत रोपांच्या बुंध्याशी घातले. या दिवसात पावसाळा असल्यामुळे वेगळे पाणी द्यावे लागले नाही.

१ महिन्यानंतर म्हणजेच १८ जुलै ला रोपांची पुन्हा लागवड केली. दोन रोपांमध्ये व रोपांच्या दोन रागांमध्ये ४० सेमी एवढे अंतर ठेवून खड्डे खणून प्रत्येक खड्डयात एक याप्रमाणे रोपांची लागवड केली. लागवड करत असताना युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश हि खाते रोपांच्या खड्डयात घालण्यात आली. रोपांना नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम हि पोषकद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळवीत म्हणून या खतांचा वापर करण्यात केला.

२-३ दिवसांच्या अंतराने रोपांचे निरीक्षण करणे सुरु ठेवले. रोपांची वाढ होतांना दिसत होती. शेत बेणणे, कीटकनाशक (mustang) व बुरशीनाशक (carbendezim 50%) यांची फवारणी करणे ही कामे वेळोवेळी केली जात होती. रोपांची पुन्हा लागवड केल्यानंतर १ सप्टेंबर या दिवशी त्यांना मातीचा भरावा देण्यात आला. म्हणजेच रोपांच्या दोन रांगांमधील माती खणून ती रोपांच्या बुंध्याशी घालून हाताने व्यवस्थित दाबली. यामुळे रोपांना आधार मिळून ती व्यवस्थित वाढण्यासाठी मदत होते.

काही काळाने असे लक्षात आले की रोपांचे डुकरे व माकडे अशा प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे झेंडूच्या शेताभोवती कुंपण बांधण्याचा निर्णय घेतला. व त्याप्रमाणे शेडनेट चे कुंपण झेंडूच्या शेताभोवती उभारण्यात आले. ११ सप्टेंबर च्या सुमारास झाडांची वाढ चांगली होत असल्याचे दिसून आल्यामूळे झाडांची छाटणी केली. यामूळे नवीन फांद्या येण्यास मदत होते. याच दरम्यान रोपांना कळ्या येत आहेत हे निदर्शनास आले. ३-४ दिवसात थोडी फुले फुलून आली होती. लवकरच गणपती हा सण होता. या दरम्यान बरीच फुले फुलल्यामूळे १३-१४ किलो फुलांची विक्री केली. महिन्याभराने आलेल्या नवरात्र या सणाच्या वेळी फुलांची पुन्हा विक्री करण्यात आली. नवरात्र ते दसरा या दरम्यान २२-२३ किलो फुलांची विक्री केली.

आतापर्यंत या वर्षी अंदाजे ३५-३६ किलो फुलांची विक्री करण्यात आली. परंतू मधल्या काळात फुले असूनही  गिऱ्हाईक नसल्यामूळे फुले वाया गेली. प्रवास खर्च लक्षात घेता राजापूर या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन फुलांची विक्री करणे फायदेशीर ठरत नाही असे दिसून आले. त्यामूळे फुलांची विक्री दवाखान्याजवळील गावांमध्ये केली. फुलांना बहार चांगला आला व फुलांची प्रत सुद्धा चांगली होती.  

निरीक्षणे:

काही अपरिहार्य कारणांनी:

  1. रोपांना मातीचा भरावा देण्यास उशीर झाला.
  2. रोपांची छाटणी वेळेत झाली नाही.
  3. किटकनाशकांची फवारणी करण्यास उशीर झाला.
  4. पाऊस कमी झालेला असताना रोपांना बाहेरून पाणी दिले गेले नाही.

वरील सर्व कारणांमूळे फुलांच्या उत्पादनात घट झाली. यामुळे यावेळी फुलांच्या विक्रीतून नफा झालेला नाही. यावर्षी असेन्द्रीय खते, कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा वापर केला. पुढील वर्षीच्या लागवडीत होमिओपॅथिक औषधांचा वापर केला जाईल या दृष्टीने अभ्यास सुरु आहे.

पुढील सत्रात फेब्रुवारी २०२४ मध्ये आपण नाचणी लागवडीबद्दल  आढावा घेणार आहोत.

November 2023

Farm management

Marigold Plantation

In this session we are going to take a brief look at cultivation of marigold plants. It was planted on the land in front of the ARH’s clinic at Kotapur centre.

Marigold was planted on the land in front of the clinic which is about 2.25 gunthas. On 9th June this land was ploughed. Then 120 Kg manure was spread all over this land and to mix it well with soil this land was ploughed again. It helps to improve structure of soil. On 15th June African marigold double orange seeds of marigold were sown at the one corner of the land. Within 8 to 10 days germination of seeds took placed and small seedlings were formed. On 8th July for proper growth of seedlings 100gm urea was provided near the roots of seedlings. Because of rainy season external water supply was not required.

After about 1 month, on 18th July seedlings were replanted. Land was dug and small pits were made in it. In one pit one seedling was planted and soil around root of seedling was pressed properly. 40cm distance was kept between two pits and two rows of seedlings. During replantation fertilizers like urea, single super phosphate and muriate of potash were supplied in each pit to provide proper amount of nutrients like Nitrogen, Phosphorous and Potassium to each seedling to ensure proper growth.

All seedlings were growing in due course. They were observed to grow properly at an interval of 2/3 days. Weeds were removed and insecticide and pesticide were sprayed intermittently. On 1st September some more amount of soil was provided to marigold plants. Land between two rows of plants was dug and soil removed was provided at the trunk of each plant and pressed for support of growing marigold plants.

After few days it was observed that animals like pigs and monkeys destroyed some plants. So shed net (kind of material like net) fence was built around the plantation. Around 11th September pruning of plants was done for formation of new branches on the plants. During this period some buds were seen on some marigold plants. After that within 3 to 4 days flowers started blooming. By this time Ganpati festival was nearing and we had blossomed in our field. Hundreds of flowers were blooming. We could sell 13 to 14 kg flowers. Again during Navratri and Dussehara festival flowers were in demand. We had a sell of the flowers, around 22 kg.

This year around 36 kg flowers were sold. There were no customer except these two festivals, due to lack of demand the flowers dried up and were wasted. We could not sell the flowers at Rajapur market as it was not profitable due to transport expenses. But we could manage to sell at nearby villages. Blossom and quality of flowers was good.

Observations :

  1. Extra soil was not provided to seedlings on time.
  2. Pruning was not done at proper time.
  3. Application of insecticide was late.
  4. When there was no rain, water was not provided to marigold plants.

Due to reasons mentioned above production of flowers was lowered. Because of this we did not make any profit this time from the sell of flowers. This year we used inorganic fertilizers, insecticide and pesticide. Study about the use of homeopathic medicines in the marigold farm, next year, is our agenda.

In the next session February 2024 we will be discussing about ragi farming.