नोव्हेंबर 2022

पूरक विचार

शहरी जीवनातील प्रश्र्न व त्यावर उपाय

शहरी जीवनामध्ये मग ते तरूण असोत, लहान मुलांचे पालक असोत, मुले अथवा वृध्द असोत, त्यांचे प्रश्र्न वेगवेगळ्या स्तरांवर परंतू खेड्यातील माणसांसारखेच असतात.

शिक्षण, लग्न, नोकरी, आर्थिक स्थैर्य, चालीरीती, रूढी यांचा पगडा शहरातही असतो. एक प्रमुख्याने असणारा फरक म्हणजे शहरांमध्ये कारखाने व इतर अनेक व्यवसाय यामधून पैसा मिळतो. सुखसोयी वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यामध्ये होते काय की जिवंत सृष्टीला आवश्यक असणारे नैसर्गिक घटक त्यामुळे ओरबाडले जातात. या कारखान्यांना किंवा एकूणच शहरी जीवनामध्ये energy म्हणजेच शक्ती लागते. ती या नैसर्गिक घटकांकडूनच मिळते. उदाहरणार्थ, विजेची निर्मिती. दुसरी एक चिंतेची बाब म्हणजे यातून जो कचरा निर्माण होतो तो नष्ट करणे शक्य नसते. उदाहरणार्थ, संगणक, मोबाईल अशा प्रकारच्या वस्तू.

हे सगळे प्रश्र्न झाले, पण त्यावर उपाय काय याबद्दल विचार करूया. शहरी समाजात अतिशय थोडा वर्ग संपत्तीत लोळत असतो. त्याच्या कितीतरी पटीने जास्त प्रमाणात गरीबीत राहणारा, मोलमजुरी करणारा वर्ग असतो. हे दोन्ही घटक वेगवेगळ्या कारणांनी सामाजिक प्रश्र्नांबाबत संवेदनशील  नसतात. त्या शिवाय ज्याला मध्यम वर्ग म्हणता येईल ते बर्‍याच प्रमाणात सुशिक्षित, समाज व्यवस्थेबद्दल विचार करणारे असतात. परंतू सुरवातीला उल्लेख केलेल्या प्रश्र्नांबाबत ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसतात. अशा मंडळींनी एकत्र येऊन, विचार करून अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. काही गोष्टींचा उल्लेख  करावासा वाटतो.

  1. सार्वजनिक वाहतुकीचा वापर – त्यामुळे खाजगी वाहने, त्यावरील खर्च, त्यातून निर्माण होणारे कार्बनयुक्त वायू, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी व वेळेचा अपव्यय कमी होईल.
  2. घरातील नळाचे पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  3. मुलांच्या अनौपचारिक शिक्षणाबद्दल विचार करून आपल्या सोसायटीत अथवा इतर समुहांमध्ये त्याची सुरुवात करावी.
  4. लग्न, रूढी इत्यादी अगोदर चर्चिलेल्या गोष्टींमध्ये योग्य ते बदल करण्यास सुरुवात करावी.

    शहरी व खेड्यातील तरुणांनी व मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन/जमून खालील गोष्टींबाबत चर्चा करावी, कृती करावी.

पुढील दोन सत्रांमध्ये आपण इकिगाई या जपानमधील तत्वज्ञानाबद्दल जाणून घेऊया.

November 2022

Supportive Thinking

Life of youths and parents in city

Youths, children and their parents as well as old people in city life face similar difficulties as people in villages. It may be different domains.

City youths also encounter difficulties in education, jobs, economic stability, socio-cultural customs etc. The main difference lies in earning sources in city. City economy runs on the finance generated through industries related to providing comfort and human life. Huge amount of energy is required for these industries. The energy comes from natural resources, for ex., electricity from water or coal. During the process we are causing degradation of Earth itself. Another factor is the large amount of waste is created as technology advances which is not biodegradable. For ex., mobile, computer and many such items.

What is the solution? Let us discuss it. Cursory look at city societal structure reveals that there are just handful of individuals who are very rich as against a very large section of the society is poor working class. Due to various reasons these two classes are indifferent to such problems. Only the middle class which, by and large, is educated thinks on social issues. Today we find them in confused state as we have discussed in earlier sessions. They can form small groups and initiate the process of change.

Few items can be suggested to make the beginning:

  1. Use of public transport – This will reduce the emission of carbon from vehicles helping to have clean air. Traffic on the road will be better saving thousands of man hours wasted in travelling by the office goers.
  2. Flow of tap water can be reduced saving water which comes from villages around.
  3. Conscious group can start the experiment of nonformal education in societies and schools etc.
  4. The changes can be made in social customs related to marriage and other ceremonial gathering discussed earlier.

Understanding is required in city and village people to come together, think and discuss these issues.

Following diagram may be helpful to think.

In next 2 sessions we will try to understand “Ekigai”, the Japanese philosophy.