नोव्हेंबर 2022

शेती व्यवस्थापन

व्यवसाय करतांना घ्यावयाची काळजी

व्यवसायामध्ये खालील गोष्टींचा विचार करणे महत्वाचे असते –

  1. उत्पादन क्षमता
  2. मूलभूत सोयी
  3. अर्थव्यवस्था
  4. मनुष्यबळ
  5. वितरण/विक्री
  6. नवीन कल्पना
  7. फायदा
  8. सामाजिक जबाबदारी

    कोतापूर येथील प्रयोगामध्ये या बाबतीत कसा विचार करावा ते बघूया.
  1. उत्पादन क्षमता – शेतीतील उत्पादन हाच कच्चा माल असल्याने त्याच्या पुरवठ्याची सोय केल्याशिवाय उत्पादनक्षमतेचा अंदाज येणार नाही. उदा. आपण गावठी आवळ्यांपासून काही उत्पादने जसे मोरावळा, लोणचे इ. करण्याचे ठरविले तर कुणाकुणाकडे आवळ्याची झाडे आहेत, आवळा किती मिळेल याचा अंदाज घेऊनच उत्पादन क्षमता ठरेल.
  2. मूलभूत सोयी – यामध्ये अनेक गोष्टी येतात. वनस्पतींची जोपासना, त्यांवर येणार्‍या रोगांवर उपाययोजना, उत्पादन तयार झाल्यावर साठवणूक, वाहतुकीची सोय इत्यादी.
  3. अर्थव्यवस्था – कर्जफेडीची नीटपणे योजना आखल्याशिवाय कर्ज घेणे आवश्यक असले तरी त्रासदायक ठरू शकते. उत्पादन कमी असणे, मागणी कमी अशा अनेक कारणांनी फायदा कमीजास्त होतो. त्यामुळे कर्जफेड कठीण होते. परंतू जाणीवपूर्वक जोखीम (calculated risk) घेणे आवश्यक असते.
  4. मनुष्यबळ – ऑक्टोबरच्या सत्रामध्ये मनुष्यबळाचा विचार आपण केलेला आहे.
  5. वितरण/विक्री – वितरण/विक्री हे अत्यंत महत्वाचे असते. गिर्‍हाईकाला काय हवे, कसे हवे आहे याचा अंदाज घेणे, आपल्या मालाची योग्य त्या प्रकारे जाहिरात करणे, विक्रेते/दुकानदार/मॉलमधील व्यापार याची माहिती असणे अशा अनेक गोष्टी मार्केटिंगशी निगडीत आहेत. उत्पादन क्षमता व वितरण/विक्री याची योग्य प्रकारे सांगड घालणे जरूरीचे असते.
  6. नवीन कल्पना – अनुभव, संबंधित विषयासंबंधी वाचन, तंत्रज्ञानाची माहिती यामधून नवीन कल्पना सुचतात. त्यांचा वापर योग्य त्या प्रकारे करणे फायदेशीर ठरते. धंदा हे क्षेत्र अनेक कारणांनी अस्थिरच असते. त्यामुळे बदलांना सामोरे जाण्यास कल्पना आवश्यक असतात.
  7. फायदा – जेवढा फायदा जास्त तेवढा व्यवसाय चांगला हे ओघाने आलेच. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मिळालेला फायदा गृपमधील इतर लोकांनाही लाभदायक असावा.
  8. सामाजिक जबाबदारी – आपला व्यवसाय हा समाजव्यवस्थेला पूरक असावा हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

डिसेंबरमधील सत्रात याच विषयावर चर्चा करूया.

November 2022

Management of Agriculture

Agriculture as a business

In any business it is important to think over following factors:

  1. Production capacity.
  2. Fundamental factors.
  3. Finance.
  4. Manpower
  5. Marketing / sell.
  6. New ideas.
  7. Profit.
  8. Social responsibility.

Let’s check how to think over above mentioned factors regarding experiments, which we are conducting at Kotapur.

  1. Production capacity – Agriculture crop food and other food material, we get from different plants, is the raw material, which we are going to use in our business. Therefore, we cannot analyse production capacity, till we get idea about supply of raw material. For ex. – If we are going to make different food products of Amla, we have to collect information about, how much Amla we can get from village people and also cost of it. Then only we can analyse our production capacity.
  2. Fundamental factors –It includes many factors, such as plant care, treatment of diseased plants, storage of products, transport etc.
  3. Finance – If we are taking loan for business, we should have proper repayment plan or else it would be troublesome for us. Sometimes we make less profit, due to many reasons, so in this period, repayment of loan becomes difficult, but it is also important to take calculated risk.
  4. Manpower – We have already discussed about this factor in the October session.
  5. Marketing / Sell –It is very important factor. Some factors related to marketing are, evaluation of need of customer, advertisement of our products, information about different sellers, shopkeepers, malls etc. There must be proper balance between production capacity and sell of products.
  6. New ideas – New ideas can be developed from experience, information about technology, reading different articles, books related to business. It is important to implement the ideas properly. Any business is always unstable due to many reasons; therefore, new ideas are needed to face the changes taking place.
  7. Profit – When we make more profit, we say, that business is good. But it is important to remember that, the profit made by business must be profitable for all members of the group.
  8. Social responsibility – it is important that our business should complement the social system.

We will discuss on same topic in December session.