फेब्रुवारी 2022

संशोधन

आपल्या भोवतालचे जग आपल्याला 2 गटात विभागता येईल. 1) सजीव सृष्टी (सजीव जग) 2) निर्जीव सृष्टी (निर्जीव जग). सर्वदूर विचार केला तर शेती व्यवसाय हा सजीव सृष्टीशी संबंधित असतो.

सृष्टी संबंधी विचार करतांना काही मुलभूत गोष्टी लक्षात घेतल्या तर समजायला सोपे जाते.

त्या पुढील प्रमाणे –

  1. रूप, घटक रचना व कार्य –
  • रूप – रूप म्हणजे डोळ्यांनी जे दिसते ते.
  • घटक रचना – उदा. दगड असो की जिवंत प्राणी, ते काही घटकांनी बनलेले असतात. हे घटक विशिष्ट रीतीने रचलेले असतात. त्यालाच म्हणतात घटक रचना.
  • कार्य – जे जे दिसते त्याचे काहीतरी कार्य असते. ते आपल्याला माहिती असते किंवा नसते.          

महत्वाचे म्हणजे रूप, घटक रचना व कार्य हे तीनही एकमेकांशी संबंधित असतात.

एक उदा. घेऊया.

लिहावयाच्या खडूचा विचार करूया.

– पांढर्‍या रंगाची, लांबट आकाराची वस्तू हे सर्वसाधारणपणे खडूचे रूप.

– कॅल्शिअम या मुलभूत द्रव्यापासून तो बनतो. ही झाली त्याची घटक रचना.

– खडू आपण लिहिण्यासाठी वापरतो. हे झाले त्याचे कार्य.

आता लाल रंगाचा खडू घ्या. या तीनही गोष्टीमध्ये बदल कसा होतो ते पहा.

– रूप – रंग बदलला (लाल खडू)

– घटक रचना – कॅल्शिअमध्ये लाल रंग घातल्यामुळे मुलभूत घटक रचनेमध्ये बदल झाला.

– कार्य – लाल रंगाच्या खडूचा वापर आपण लिहितांना काही विशेष दाखवायचे असेल तर करतो (कार्य बदल)

2. गुणधर्म व मापन –

आपल्याला जे दिसते त्याचे काही गुणधर्म असतात व त्याचे मापन करता येते. यामध्ये गंमत अशी आहे की गुणधर्माबाबत मतभिन्नता असू शकते. पण मापनाबद्दल तसे नसते.

उदाहरणार्थ, खडूचा रंग पांढरा, गुलाबी, लाल भडक, असे त्याचे वर्णन करता येईल व त्यामध्ये मतभिन्नता येईल. पण 25 खडूंचे वजन 100 ग्रॅम आहे की 80 ग्रॅम आहे याबद्दल मतभिन्नता होणार नाही.

3. काळ-वेळ व व्याप्ती –

सृष्टीमध्ये जे जे दिसते त्यामध्ये काळाप्रमाणे बदल होत असतात व त्याला आयुष्य असते. मग ते क्षणाचे असो अथवा अनेक वर्षांचे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट वेळी त्याबद्दल केलेली निरिक्षणे काही काळानंतर बदलतात. एखाद्या जागी ठेवलेला खडू काही दिवसांनंतर वापरल्यामुळे लहान झालेला दिसेल किंवा लिहून संपल्यामुळे दिसणारच नाही. वरील गोष्टीचा परिणाम खडूच्या जागेवर (व्याप्तीवर) होईल. वापरल्या गेलेल्या खडूच्या जागेत दुसरा खडू असेल किंवा तेथे काहीच नसेल आणि हवा ती जागा व्यापेल.

4. बदल

या सर्व वर्णनावरून लक्षात येईल की बदल हा सृष्टीचा एक लक्षात घेण्यासारखा पैलू आहे.

सारांश :

  1. रूप, घटक रचना, कार्य
  2. गुणधर्म व मापन
  3. काळ-वेळ, व्याप्ती
  4. बदल

या चार गोष्टींचा विचार केला तर जिवंत सृष्टीबद्दलची माहिती समजणे सोपे जाईल. 

 त्याबद्दल पुढील सत्रात विचार करू.

February 2022

Research

The world we see around can be divided into living and non-living. Agriculture profession deals more with the living world. Certain basic concepts will help us in understanding the living world.

  1. Structure, Form, Function –

Structure – The material components from which anything is made and the manner of their arrangement.

Form – Whatever we perceive through five senses i.e., vision, hearing, smell, taste and touch. Generally, we use the term for external appearance. However, it is profitable to use it in extended meaning. For example , with electron microscope one can see more details of an object.

Function – Everything has some function. We may or may not be aware of it.

To illustrate, we will take the example of a chalk.

Form – Generally white colour, circular oblong shape object.

Structure – Made up of calcium carbonate.

Function – For writing.

Now think of red chalk.

Form – The colour has changed.

Structure – Red colour requires something besides calcium carbonate.

Function – We use it for writing some important matter.

In short, when there is a change in one aspect it will have an impact on other two aspects.

2. Quantity, Quality –

  • Whatever we observe can be measured what we call as quantity.
  • Certain aspects are qualitative which cannot measured.

For example,

  • Whether a set of chalks is 100 or 200 gms. Can be measured and everyone will agree.
  • White or red colour of chalk are qualitative aspects. Shades of colour may different and there may be different opinions on it.
  • In living world many aspects are qualitative. Science needs quantification.

3. Time and Space –

  • Everything is here at certain time, persists from few seconds to many years and disappears. (Time or temporal dimension)
  • Everything that is material occupies a space. (Spatial dimension)
  • If we take into account the above facts, it is apparent that whatever is observed at a particular moment in time will change as the time passes.

For example,

  • Taking the same example, the chalk may become smaller in size due to its use or changes in surroundings. The space may be occupied by air or some other object.

4. Change –

From the foregoing account it is evident that change is the fundamental aspect of the universe.

In brief,

1.  Structure, form, function.

2.  Quality, Quantify,

3.  Time and space

4.  Change

We will try to understand the living world on the background of these 4 concepts.