मे २०२३

पूरक विचार

जीवनशैली: एक नवीन प्रयोग

संदर्भ: Dr. S. S. Apte यांचे लेख

डॉक्टरांकडे गेलो की “तुमचा आजार हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे ” हे वाक्य हल्ली लहानांपासून ते वृद्धांपर्यंतच्या आजारांच्या संदर्भात कानावर येते. मग फास्ट फूड, संगणक/मोबाईलचा अति वापर टाळावा, रोज फिरायला जावे इत्यादी सूचना. अलीकडील काळात असे काय झाले आहे की ज्यामुळे जीवनाचा विचार न करता माणसे जीवनशैलीचा विचार करू लागली आहेत?

तसे पाहिले तर प्राणी म्हणून आपण या पृथ्वीतलावर लाखो वर्षांपासून रहात आहोत. अगदी सुरवातीला मानव हा इतर प्राण्यांप्रमाणेच कळप करून रहात होता. पुढे त्याचे वेगळेपण आले ते विचारशक्तीच्या सामर्थ्यावर. आकाशातील अज्ञात शक्तीला नियंत्रक मानून त्याने जगण्याचे नियम बनविले. विचारांच्या सहाय्याने दगडांपासून शस्त्रे बनविली. झाडांच्या सालीचा वापर करून थंडीपासून बचाव केला. असे अनेक प्रयोग करीत त्याची प्रगती होत राहिली.

मानवी संस्कृती म्हणून ज्याला म्हणता येईल ती साधारण 5 ते 6 हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये नाईल नदीजवळ, आपलेकडे सिंधु नदीच्या काठी, चीन मध्ये पीत नदीच्या तीरावर व इतर काही ठिकाणी विकसित होत गेली. शेती, घरे, भांडी, नाणी ही प्रगतीची चिन्हे. अज्ञात शक्तीला ईश्वराचे रूप आले. नीतिमत्तेचा उगम तेथून झाला. एकत्र रहाण्याने परस्परांवर विश्वास, प्रेमभावना बळकट होत गेली.

हळूहळू समाजावर सत्ता गाजविणारे राजे व त्यांची राज्ये उदयाला आली. ईश्वर या संकल्पनेभोवती गुंफले गेलेले वेगवेगळे धर्म त्यांनी स्विकारले. भिन्न भिन्न संस्कृती या पृथ्वीतलावर दिसू लागल्या. पैसा हे मानवी व्यवहाराचे साधन बनले. त्याचे परिणाम जरी सर्वत्र दिसू लागले तरी धर्म, नीतिमत्ता, प्रेम या प्रवृत्तींना त्याने फारसा धक्का दिला नाही.  युद्धे झाली, साम्राज्ये धुळिला मिळाली तरी ज्ञानशाखा विकसित होत गेल्या. भाषेची जोड मिळाल्याने कला, तत्वज्ञान यात मोलाची भर पडली. हे सर्व घडत असतांना ‘मानवी जीवन ” हे विचारांचे केंद्रस्थान होते.

16व्या शतकात विज्ञान संस्कृतीचा उदय झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर विशेषत: यूरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे जीवनात जो बदल होत गेला तो दोन प्रकारचा होता. ईश्वर, धर्म या संकल्पनांना विज्ञानाने दिलेले आव्हान व त्याचवेळी विज्ञानाबरोबर आलेल्या तंत्रज्ञानाने मानवाला बहाल केलेल्या सुखसोयी. निसर्गाशी झगडत बसण्यापेक्षा तंत्रज्ञानामुळे मिळणार्‍या सुखसोयींचा वापर करण्याकडे माणसाचे मन स्वाभाविकपणे झुकले. तरीसुद्धा अगदी अलीकडेपर्यंत माणसातील विश्वास, प्रेम यांचे मानवी जीवनातील स्थान कायम होते.

गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र झपाट्याने बदलले. संगणकाने मानवी विचाराला गती दिली. जैव तंत्रज्ञानात क्रांती होऊ लागली. मानवी जनुकाचा आलेख माहीत झाल्यावर तर मानवाला मानवाशीच खेळता येऊ लागले. ही प्रगती एवढ्या वेगाने होत होती की मानवाने जणू काही एक वेगळे विश्वच निर्माण केले. त्यामध्ये रहायचे असेल तर त्याला पूरक अशी एक जीवनशैली बनविली, नव्हे आपण सर्वचजण त्यामध्ये गुरफटलो गेलो. हे असे कसे झाले? थोडा विचार केला तर असे लक्षात येईल की या सर्व तंत्रज्ञानाचा वापर सुखसोयींसाठी करायचा झाला तर प्रचंड पैसा लागतो. त्यामुळे मानवाने सुखी जीवनासाठी निर्माण केलेल्या सर्व ज्ञानशाखा व त्यावर आधारीत सर्वच व्यवसाय हे जास्तीत जास्त पैसा व त्यामुळे येणार्‍या सुखसोयी यासाठी उपयोगात आणले गेले. पैसा व त्याचबरोबर येणार्‍या सुखसोयी हे समीकरण बनले. पैसा व प्रेम/नीतिमत्ता यांचे नाते व्यस्त असल्याने समाजाची उभारणी ज्या पायावर झाली त्यालाच धक्का बसू लागला. दुसरा परिणाम म्हणजे ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या तसे त्याचे नवीन नवीन तुकडे बनविले गेले व त्याचा उपयोग विशेषतज्ञ करू लागले. त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर झाला. एकांगी विचार हे हल्लीच्या शिक्षणपद्धतेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. पैसा हे साध्य व जोडीला एकांगी विचार, त्यामुळे बाजारीकरण ओघाने आलेच. जीवन, सुख, नितीमत्ता असल्या गोष्टींवर विचार करायला खरे तर कुणाला वेळच नाही. हे अर्थात अर्धसत्य आहे. तो विषय पुढे येईलच.

या विषयाशी संबंधित पण चटकन लक्षात न येणारा एक परिणाम म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा वेगाने होणारा र्‍हास. जरा विचार केला तर असे लक्षात येईल की तंत्रज्ञानामुळे येणार्‍या सुखसोयी या नैसर्गिक संपत्तीमधूनच निर्माण होतात. खरे तर मानवी शरीर हा एक निसर्गाचाच भाग आहे. पृथ्वी, जल, वायु, अग्नि व आकाश ही पंचमहाभूतांची आयुर्वेदातील संकल्पना त्यावरच आधारीत आहे. आयुर्वेदात एक श्लोक आहे, 

सत्वमात्मा शरीरंच भयमेतात्भि दण्डवत् ।

लोकस्तिष्ठति संयोगात्तत्र सर्वं प्रतिष्ठिताम् ।।

(म्हणजे मन, आत्मा व शरीर या  खांबांवर माणसाचेच नाही तर सर्व जगाचे अस्तित्व अवलंबून आहे.)

याचा गर्भितार्थ असा की या जगाची जबाबदारी आपल्यावर आहे.

आम्हा  डॉक्टर मंडळींपुढे पुढील प्रकारचे प्रश्न मांडले जातात. त्यांची उत्तरे केवळ औषधातच नसतात. अशा प्रयोगातूनच आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल.

1)    14 वर्षांचा मुलगा. आईची तक्रार, तो सारखा संगणकावर फेसबुकमध्ये गढलेला असतो.

2)    एक मध्यम वयीन गृहस्थ. पतपेढीत कामाला. अचानक रक्तदाब. कारण? त्याला वरची श्रेणी देण्यात आली. पगार वाढला. पण – हिशोबामध्ये गफलत दिसत असूनही सह्या कराव्या लागणार होत्या. मॅनेजमेंटचे सांगणे, ‘काही होणार नाही हो. आम्ही आहोत.”

3)    खेडेगावातील डॉक्टरांबरोबर जात असता त्यांची आपापसात चर्चा – ‘प्रतिजैविकाचा 5 दिवसांचा कोर्स पेशंट घेऊ शकत नाही. मग जेवढे पैसे असतात तेवढ्याच दिवसाचे औषध द्यावयाचे.  मी सलाईन दिले नाही तर दुसरा देणारच. मग मीच द्यावे.”

4)    65 वर्षांचा केरळीय गृहस्थ. बाय पास सर्जरी लगेच करावी लागेल असा सल्ला. म्हणाला, माझ्या मुलाने आत्ताच जागा घेतली आहे. त्याचा मुलगाही लहान आहे. माझी जबाबदारी आता संपली आहे. मी गावी जाऊन राहीन. ऑपरेशन वगैरे मला नको. काही औषध देता आले तर द्या.

5)    एक 20 वर्षांचा गावाकडून आलेला मुलगा. सतत आजारी. गावाकडे जमीन बर्‍यापैकी आहे. पण शेती बिनभरवशाची. कुरिअर सेंटरमध्ये नोकरी. काळोख्या लहानशा जागेत रहातो.

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जसा विचार करू तशी येतील, त्याप्रमाणे कृती घडेल व जशी कृती असेल तसे परिणाम दिसतील. त्यासाठी पुढील लेखात ( ऑगस्ट २०२३ ) आपण  ‘विचार” या संकल्पनेबद्दल विचार करुया.

May 2023

Supportive thinking

Life Style – A New Experiment

Ref.: Articles by Dr. S.S. Apte.

Many a times, while in practice, physicians have to make ambiguous statements. This may be due to lack of time or accurate answers for certain questions are difficult. One such word which is used loosely is “Life style”.

It is a common experience to hear from a physician that your life style is responsible for your ailments. This is applicable to everyone, whether he is a child or an old person. Then follows the advice on fast food, excess use of computer, mobile etc. What has happened in recent times so that everyone has started talking on life style without thinking on life itself?

Man has lived on this earth for millions of years. In the beginning man, like other animals, was living in flocks. He distinguished himself from other animals due to his capacity of thinking. He accepted an unknown power in the sky as controller and formulated rules for life and living. Making weapons out of stones, utilizing bark of trees for protection were the initial experiments in his progressive journey.

Cultural evolution of man started around 5 to 6 thousand years back on the banks of river Nile in Egypt, near Sindhu river in our own land, while in China it was near the river Pit. Agriculture, houses, utensils, coins etc. symbolize such progress. The concept of God denoted man’s belief in supernatural power. Simultaneously morality was rooted in his mind. Living together was possible due to trust and love among society members.

Subsequently one finds era of various kingdoms with kings wielding authority over the society. They accepted different religions and gods. Cultural peculiarities were noticed in different cultures. Money became an accepted ingredient in his life for transaction. The deleterious effects of money were noticed, but religious values as well as love and trust remain a corner stone of social stability. Various knowledge areas fostered in spite of wars fought from time to time and rise and fall of empires. The arrival of language was marked by progress in Arts, Philosophy and so on. All the knowledge revolved around human life to  make it more and more happy.

Sixteenth century marked the growth of science, especially in Europe. The industrial revolution that followed made changes in human life on two counts. It challenged the religion and the God, at the same time offering comforts to human life through technology. Rather than struggling with nature man preferred to use technology for more and more comforts. Even then, till recently, the foundation of love and trust in human life remained unshaken.

In the recent past this picture has radically changed. Computer accelerated human thought many folds. Tremendous progress occurred in bio-technology. With the map of human genome in hands, man started playing with Man. It is as if a different world is being created with whirling speed. We all are entangled in it. How this has happened?

If one thinks for a while, one can find that money is crucial to have the comforts provided by technology. It was but natural that man started exploring all knowledge areas and professions based thereupon to earn more and more. Money and morality have inverse relationship. Therefore, the foundation on which human society is based, has itself being dealt a blow. The horizon of knowledge widened giving rise to specialties and super specialties. It has its impact on education. Microscopic view of the world, with the blinkers on the thought process, are the hall marks of today’s education. Parochial view of life with money as an end in itself, led to commercialization in every profession. There is hardly any time to think on happiness and morality. This is a half truth. We shall consider this aspect later.

Another important, but subtle aspect of this changing world is the diminution of natural wealth. One has to understand that luxuries provided by technology have their origin in nature. In fact human body is also a part of nature. The concept of panch-maha-bhuta i.e. earth, water, air, fire and space, in Ayurveda is based on this premise. One Shloka in Ayurveda is relevant to our subject

स्वत्वमात्मा शरीरंच भयमेतात्भि दण्डवत I

लोकस्तिष्ठती संयोगात्तत्र सर्वं प्रतिष्ठिताम II

(It means that mind, soul and body are the three pillars on which not only human being but the universe rests.)

It conveys that man has responsibility to protect the world around.

The experiment suggested, encompasses all the above mentioned facets of life and living. Some of the problems posed by the patients are given below. Medicine is not sufficient to answer these, hence this experiment.

  1. 14 years old boy. Mother’s complaint – he is continuously engrossed in face-book or computer.
  2. A middle aged person. Employed in a credit society. Sudden increase in blood pressure. Reason? He has been promoted with attractive salary package. But he has to sign certain papers despite observing certain irregularities. Management says “Nothing will happen. We are there”
  3. While travelling with couple of physicians from village side, their talk – A patient cannot afford for 5 days course of anti-biotic. I give only 2-3 days medicine as per his paying capacity. Another physician remarks – I give saline if patient demands because if I do not give he will go to doctor  XYZ.
  4. A 65 years old man from Kerala. He was advised to undergo by-pass surgery urgently. He said, “My son has just purchased a flat. His son is only 4 years. My responsibilities are over. I do not want to get operated. If you have some medicine, I will take that and go to my village.”
  5. A 20 years old boy from a village. Continuously ill. Owns sizable agricultural land at his native place, but prefers to be in Mumbai. Service in a courier center. Lives in a small dark room in a chawl with 2-3 friends.

The solutions and answers to these problems depend upon the way we think. Thinking will determine the action and action will lead to the result.

In next article (August 2023) we shall deal with thinking and thoughts.