मे 2022

पूरक विचार

आपले मन

मागील  सत्रात आपण शरीराबद्दल माहिती घेतली. त्यामध्ये आलेले र्‍हदय, मेंदू असे अवयव आपणाला दिसू शकतात. शरीराबरोबर मन हेही माणसाला असते. मन म्हणजे काय? मला मन दाखवा असे कोणी विचारले तर गोंधळल्यासारखे होईल. नाही का? अशा या मनाबद्दल थोडी माहिती घेऊया.

आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, नाकाने श्र्वास घेतो तसेच वासही घेतो (तो सुगंधी असेल किंवा दुर्गंधी), जीभेने आपल्याला चव कळते तर त्वचेमुळे स्पर्श कळतो. या सगळ्या संवेदना आपल्या मेंदूत जातात. तसेच सगळ्या अवयवांच्या कार्याबद्दलची माहिती मेंदूला मिळत असते. ही सगळी माहिती वेगवेगळ्या ठिकाणी जात असली तरी शेवटी ती एकत्र करून मेंदू  “ विचार ”  करतो व त्याप्रमाणे अवयवांना आज्ञा देतो. मेंदूमधील हे विचार साधारणपणे दोन गटात विभागता येतील. भावना व बुद्धी.

  1. भावनात्मक विचार – मला भीती वाटली, राग आला, फार वाईट वाटले इ.
  2. बुध्दीवादी विचार – ही काचेची वस्तू फेकणे हे बरोबर नाही कारण ती फुटेल, मला 15 मीटर कापड हवे आहे, इ.

भावनात्मक विचार हे व्यक्तीसापेक्ष असतात. म्हणजे काय तर, मला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटले तर दुसर्‍याला तसे वाटेलच असे नाही. याउलट बुद्धीवादी विचारात सर्वांचे मत एकच असेल. उदा. 15 मीटर कापड, किंवा काचेची वस्तू फेकली तर ती फुटणार याबद्दल सगळ्यांचे मत एकच असेल.

या दोन प्रकारच्या विचारांबरोबरच अजून तिसर्‍या प्रकारचे विचारही असतात. ते कोणते ते पाहुया. येथे आपण मनाबद्दल विचार करत आहोत. मनाचा विचार करतांना सोईचे व्हावे म्हणून तिसर्‍या प्रकारच्या विचारांबद्दल थोडी माहिती घेऊया.

कोणी आजारी असेल तर आपला वेळ खर्च करून आपण त्याला मदत करतो, उपाशी माणसाला आपल्याकडचे अन्न देतो, एखादा विद्यार्थी शिक्षणात मागे असेल तर पैसे न घेता आपण त्याला शिकवतो. यालाच आपण माणूसकी म्हणतो. दुसर्‍याबद्दल वाटणार्‍या प्रेमापोटी त्याचे चांगले व्हावे, जगाचे चांगले व्हावे अशा प्रकारचे विचार हे आपल्यातील ईश्र्वरी शक्तीमुळे येतात. असे मानले तर “आत्मा” या शब्दाचा अर्थ लक्षात येतो. चांगले विचार, चांगले वागणे म्हणजेच आपल्यातील ईश्र्वरी शक्तीचे झालेले ज्ञान असे म्हणावे लागेल. थोडक्यात भावनामय जग, बुध्दीवादी विचार व आत्मिक विचार या तीनही विचारांचा समतोल राखणे म्हणजेच मनाचे आरोग्य असे म्हणता येईल.

पुढील सत्रात याबद्दल आणखी माहिती घेऊया.

April 2022

Supportive Thinking

Mind

In the previous session we discussed about functioning of our body. The functional parts of our body like heart, liver, brain etc., we can observe. In relation to human being, we also talk about mind. What is mind? Show me the mind. Such questions are puzzling. We will try to understand about mind.

With eyes we see, we hear through ears, odour bad or good, we appreciate through nose, tongue helps us in taste and through skin, we sense touch. All these sensory inputs travel to brain. Brain also receives information about functioning of our organs. This information is processed by the brain, a process called thinking and what results are the thoughts. These are stored in the memory centre. Thoughts can broadly be divided in two groups.

  1. I am afraid of crowd, I got extremely irritated, I felt so sad

Such thoughts are feelings or emotions.

2. I need 15 meter cloth.

If I throw the glass bottle it will break.

Such thoughts are intellectual thoughts.

If we think further, it can be said that the emotions may differ from person to person. Same is not the case with intellectual thoughts. 15 meter cloth can be measured and everyone will come to the same conclusion.

We should remember that this way of classifying thoughts is for our convenience. The process of thinking is so fast that thoughts intermingle. For example, we sometimes feel helping someone without excepting any returns. We give food to someone or help financially even at the expense of putting our desires aside. Such thoughts arise out of conscience, spirit, soul or Atman whatever you want to call it. Atman can be regarded as the supreme energy pervading the material world, The God within us. We can call such thoughts as Atma-gyan.

In the next session we will think over the development of mind from childhood till old age.