फेब्रुवारी 2022

शेती व्यवसाय व्यवस्थापन

शेती व्यवस्थापन म्हणजे काय ? —- सर्वसाधारण :-

व्यवसाय म्हटले की मुख्यत: 4 घटकांचा विचार करावा लागतो.

1. मनुष्यबळ 

2. साधनसामुग्री 

3. तंत्रज्ञान 

4. पैसा

या सर्व घटकांचा नीटपणे विचार कसा करावा यासाठी प्रणाली दृष्टीकोन (System Approach) उपयोगी ठरतो. तो खालील प्रमाणे मांडता येईल –

वरील सर्वांचा अर्थ समजून घेऊया.

  1. प्रेरणा – कुठलेही कार्य करण्यासाठी प्रेरणा किंवा शक्ती आवश्यक असते. उदा. लिहिण्यासाठी हाताची शक्ती लागते, कार चालू होण्यासाठी पेट्रोल इ.
  2. घटक रचना – प्रेरणा मिळाली की जे कार्य असेल त्याप्रमाणे त्यातील वेगवेगळे घटक काम करू लागतात. या घटकांचे कार्य नीट होण्याच्या दृष्टीने एकमेकांशी त्यांची योग्य प्रकारे जोडणी व्हावी लागते, त्यालाच म्हणतात घटक रचना. त्यासाठी लागते तंत्रज्ञान.
  3. परिणाम – प्रेरणा मिळाली की घटक काम करू लागतात व याचा परिणाम दिसू लागतो.
  4. मूल्यमापन – झालेला परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासणे म्हणजेच केलेल्या कार्याचे मूल्यमापन.

काही कमतरता असेल तर ती दूर होण्यासाठी अथवा ते कार्य अधिक चांगले होण्यासाठी प्रेरणा किंवा घटक यांचा विचार करून त्याप्रमाणे त्यामध्ये बदल करता येतो.

आपण एक उदाहरण घेऊया. समजा आपणाला एक प्राथमिक शाळा चालू करायची आहे.

  1. परिणाम –  सुरवातीला प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे परिणाम काय असावा ते  ठरवावे लागेल.
  2. प्रेरणा – पैसा, चांगले शिक्षक (मनुष्यबळ), इमारत व इतर साधनसामुग्री असायला हवी.
  3. घटक रचना – कशा पद्धतीने शिकवावे (म्हणजेच तंत्रज्ञान) हे पहावे लागेल.
  4. मूल्यमापन – परिणामाचा आढावा घेऊन जरूरी प्रमाणे प्रेरणा किंवा घटक रचनेमध्ये बदल करावा लागेल.

शेती व्यवस्थापनाचा विचार वरील 4 मुद्दे लक्षात घेऊन करुया.

  1. प्रेरणा –

– जमीन, सूर्यप्रकाश, पाणी

– मनुष्यबळ

– यंत्रसामुग्री

– पैसा

2. घटक रचना –

  • संरक्षण (प्राणी, पक्षी इत्यादींपासून)
  • योग्य ते उत्पादन – भात शेती, कडधान्ये  इ.

-पालेभाज्या, फळभाज्या इ.

– फळशेती, फूलशेती    

– जंगली वृक्ष – लाकूड सामानासाठी

– औषधी झाडे

  • प्रत्येक उत्पन्नाची लावणी, वाढ, रोगोपचार
  • साठवणूक
  • गिर्‍हाइकांपर्यंत उत्पादन पोहोचविणे –  माल वाहतूक सेवा देणारे

– (दलाल, किरकोळ, घाऊक दुकानदार, मॉल) 

पुढील सत्रात आपण या वेगवेगळ्या पैलूंचा सविस्तर विचार करुया.   

(डॉ. आपटे यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारीत)

February 2022 

1. Management of Agriculture

General remarks –

  • To be profitable, agriculture has to be looked upon as business
  • Business management involves 4 essential components –
  1. Human resources
  2. Infrastructure
  3. Technology
  4. Finance

We will adopt system approach to consider these 4 components in a coordinate way.

  1. Input (Energy) – To perform work energy is essential. For e.g. For writing movements of hand (energy from muscles), to start a car (petrol) etc.
  2. Throughput – Arrangement of parts involved in a specific work in a well co – ordinated manner.
  3. Output (Result) – Work leads to output (Result).
  4. Assessment – Output is to be assessed in terms of quality and quantity and necessary changes to be made either in input or throughput for better results.

We will take up an example to illustrate the concept.

Suppose we want to start a primary school.

  1. To start a school – it needs building, teachers, finance etc. (Input)
  2. Architectural details of school building, methods of teaching, fees and number of such items (Throughput)
  3. The purpose of primary education (Output)
  4. Assessment – Criteria is to be devised in advance to assess the output.

Management of Agriculture can be viewed in similar fashion.

Input –

  1. Soil, water, sunlight
  2. Human resources
  3. Infrastructure ie machines, technology etc.
  4. Finance

Throughput –

       Protection of farm, type of production – Cereals, horticulture, medicinal plants etc.

            Secondary products — Juices, pickles, Milk, fish —– innumerable such items

                       From farm     ——–           Market  ———-    Customer

Output –

            Expenses, Income, Profit.

Assessment –

            Periodic review of output.

In subsequent sessions we will consider the details of every aspect.