सप्टेंबर 2022

शेती व्यवस्थापन

औषधी वनस्पती

शरीराला आरोग्य व स्वास्थ्य देणार्‍या, व्याधीतून मुक्त करणार्‍या अनेक वनस्पती आहेत. आपल्या देशात तसेच परदेशात अशा औषधी वनस्पतींची मागणी वाढत आहे. त्यामुळे औषधी वनस्पतींच्या लागवडीस महत्व प्राप्त झाले आहे. या सत्रात आपण कोकणात होणार्‍या औषधी वनस्पती व त्यांची उपयुक्तता यांचा विचार करणार आहोत.

राजापूर येथील औषध शाळेला भेट देऊन तेथे वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पतींची माहिती मिळवली. त्या ठिकाणी 72 प्रकारची विविध औषधे तयार केली जातात. या औषधांमध्ये साधारणपणे 250 प्रकारच्या औषधी वनस्पती वापरल्या जातात. यापैकी कमी जास्त मागणी असलेल्या साधारणपणे 50 वनस्पतींचे  उत्पन्न कोकणात घेता येते. त्यांनी दिललेल्या माहितीनुसार –

  1. आवळा, हरडा, बेहडा, पिंपळी, सुंठ इत्यादी गुणकारी वनस्पती आहेत. एका वर्षाला साधारणपणे 200 किलो इतकी मागणी या वनस्पतींना असते.
  2. अष्वगंधा, अडुळसा, गुळवेल, तुळस, शतावरी, हळद, कढिलिंब, वाळा, परिपाठ, मुसळी इत्यादी वनस्पतींना 1 वर्षाला 100 किलो इतकी मागणी असते.
  3. वावडिंग, रिंगणी, डोरली,कडू पडवळ, बहावा, वेखंड, चित्रक, लाजरी या सारख्या वनस्पतींना कमी प्रमाणात मागणी असते.
  4. दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी वगैरे मसाल्याच्या पदार्थांचा सुध्दा औषधांमध्ये वापर केला जातो. यांची मागणी 1 वर्षाला साधारणपणे 50 ते 60 किलो इतकी असते.
  5. सफेद मिरीला (पांढरी मिरी) मागणी व त्याचा दर सुध्दा जास्त असतो.
  6. धायटी हे रानटी झाड आहे. याच्या फुलाला जास्त मागणी आहे. त्याचा वापर जावळ जवळ सर्व औषधांमध्ये केला जातो.
  7. औषधांमध्ये वनस्पतींच्या मुळांचा सुध्दा वापर केला जातो. पहाड मूळ, टेटू मूळ, शिवण मूळ, बेल मूळ इत्यादी उपयुक्त मूळे आहेत. त्यांना जास्त मागणी असते.
  8. नागकेशर किंवा ज्याला लाकडी चाफा असेही म्हटले जाते, त्याचे फूल व त्यातील केसर उपयुक्त असून ‌त्याचा दर सुध्दा बराच असतो.
  9. सातारा येथील अर्कशाळेमध्ये लहान मुलांसाठी जे औषध बनविले जाते त्यामध्ये काजूच्या बोंडांचा वापर करण्यात येतो. तेथील अर्कशाळेत काजू बोंड व त्याचा रस यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

या सर्व वनस्पती प्रथम व्यवस्थित सुकवल्या जातात. नंतर त्यांची पाने, फुले, फळे, बी, खोडाची साल वगैरेंपासून अर्क काढून त्याचा वापर औषधांमध्ये केला जातो. तर कधी कधी साल, गर, तेल या  स्वरुपात वापर केला जातो.

अशा या औषधी वनस्पती, यापैकी लागवडीच्या दृष्टीने सोप्या असणार्‍या व आपल्यालाही घरात उपयोगी असणार्‍या वनस्पतींची लागवड आपल्या लहान बागेत करता येईल. विक्रिच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर औषध शाळेने दिलेल्या माहितीनुसार जास्त मागणी तसेच चांगला दर असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यास हरकत नसावी. त्यासाठी लागणारे भांडवल, वाहतूक खर्च, मजुरी, मिळणारा दर असा सर्व बाबींचा विचार करून नंतरच लागवड करावी हे उत्तम.

पुढील सत्रात आपण शेतीचे व्यवसायाच्या दृष्टीने व्यवस्थापन कसे करावयाचे याचा विचार करणार आहोत.

September 2022

Management of Agriculture

Medicinal Plants

Medicinal plants have been used in healthcare since immemorial time. Studies have been carried out globally to verify their efficacy and some of the findings have led to the production of plant-based medicines. The demand for medicinal plants in global market is increasing day by day. Therefore, cultivation of medicinal plants became very important. In this session we will discuss the medicinal plants which are cultivated in Konkan region.

We have visited medicine laboratory at Rajapur and collected information about the different medicinal plants which they are using while preparing different medicines. They are producing 72 types of different medicines. For preparation of these medicines, they are using around 250 types of different medicinal plants. Out of these around 50 are found and cultivated in Konkan region. Out of these 50 medicinal plants demand for some plants is more and for some is less.

According to their information –

  1. Phyllanthus Emblica (Amla), Terminalia Chebula (Harada), Terminalia Bellirica (Behada), Zingiber Officinale (Sunth) etc. are very much useful for medicine purpose. The demand for such plants is around 200 kg/year.
  2. Withania Somnifera (Ashwagandha), Justicia Adhatoda (Adulsa), Tinospora Cordifolia (Gulvel), Ocimum Tenuiflorum (Basil), Asparagus Racemosus (Shatavari), Curcuma Longa (Turmeric), Azadirchata Indica (Neem), Chrysopogan Zizanioides (Wala), Fumaria Indica (Paripath), Chlorophytum Borivilianum (Musali) etc. have demand of about 100kg/year.
  3. Embelia Ribes (Wavadung), Solanum Xanthocarpum (Ringani), Trichosanthes Cucumerina (Kadu Padval), Acorus Calamus (Vekhand), Plumbago Zeylanica (Chirtak), Mimosa Pudica (Lajari) etc. have quite less demand.
  4. Items from spices, such as Piper Nigrum (Black Pepper), Cinnamomum Verum (Cinnamon), Laurus Nobilis (Bay Leaf) etc. are also used in medicines. The demand for these is 50-60 kg/year.
  5. White pepper has more demand with high price for it in the market.
  6. Woodfordia Fruticosa (Dhayati) is a wild plant. The flowers of this plant are used in almost all medicines and it has great demand.
  7. The roots of some plants are used in medicines. To name a few – Cissameplos Pareira (Pahad Mul), Oroxylum Indicum (Tetu Mul), Gmelina Arborea (Shivan Mul), Aegle Mamelos (Bale Mul) etc. Some such roots have good demand.
  8. The flowers of the plant Mesua Ferrea (Nag Keshar) are useful for medicine preparation and give high price in the market
  9. Medicinal laboratory at Satara prepares medicines for children, for which Cashu fruit juice (Anacardium Occidentale) is used. Cashus and cashu juice are in great demand in that laboratory.

In medicine laboratory all these plants are first properly dried before using. Then the sap from different useful parts of the plant such as leaves, flowers, fruits, seeds stems, roots is removed and used in medicines. Sometimes these plants are used in the form of juice or oil.

Any such plants which are easy for plantation, can be planted in our small garden. Regarding sale, as per information collected from medicinal laboratory, plants which are in good demand as well as give good return (in terms of money) can be cultivated in large quantity. But we have to consider the investment, cost of transport, wages, marketing etc. before cultivation.