संशोधन
जनूकाचा पुढील प्रवास
मागील सत्रात आपण बघितले की जनूक हा जीवित सृष्टीचा मुलभूत घटक असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. त्याचा जन्मापासूनचा प्रवास व विकास जाणून घेऊया.
असे मानले जाते की साधारण 400 कोटी वर्षांपूर्वी जनूकाचा एक लहानसा भाग, ज्याला आर्. एन्. ए. (RNA) म्हणतात, याची निर्मिती झाली. हळूहळू त्याच्या रचनेत बदल होत गेले. त्यातील काही महत्वाचे बदल खालीलप्रमाणे.
- आपण ज्याला व्हायरस म्हणतो तो एक प्रकारचा आर्. एन्. ए. (RNA)च असतो. त्याला फक्त प्रथिन (Protein) रसायनाचे आवरण असते. व्हायरस काय करतात की प्राण्यांमधील पेशींवर हल्ला करतात व त्या पेशीतील अन्नयंत्रणेचा वापर करून अन्न मिळवितात व जगतात.
- आर्. एन्. ए. (RNA) व्हायरसपासून पुढे डी.एन्.ए. (D.N.A.) व्हायरस तयार झाला. तो आकाराने मोठ्ठा असला तरी पेशींच्या सहाय्यानेच जगतो.
- जीवाणू (Bacteria) ही पुढील प्रगत अवस्था. यांच्यामध्ये डी.एन्.ए. च्या रसायनाभोवती संरक्षक भिंत तयार झाली. एकपेशीय प्राण्यांची ही सुरूवात.
उत्क्रांतीच्या काळात पुढे अनेक पेशी असलेले प्राणी येत गेले. वनस्पती, प्राणी व शेवटी मनुष्यप्राणी असा हा क्रम म्हणता येईल. पुढील सत्रात आपण त्याबद्दल माहिती घेऊ.
April 2022
Research
Evolving genetic system
In the last session we studied that gene can be regarded as fundamental constituent of the living world. Now we will examine how it evolved over a period of time.
It is believed that around 400 crore years ago RNA (a small part of DNA) appeared on the earth. Slowly structural and functional changes occurred in this molecule. A few important ones are noted below:
- What we call as virus is a variety of RNA. This molecule is covered by protein coat. Viruses thrive by entering cells of other organisms, making use of food production machinery in those cells.
- DNA virus is similar to RNA but bigger in size.
- Bacteria occupying next step in the ladder. In bacteria there is a wall to protect DNA. One can say that it is the beginning of unicellular organisms.
During the course of evolution at some stage plants then animals and ultimately human being started living on the earth.