शेती व्यवसाय व्यवस्थापन
नाचणी लागवड
नोव्हेंबर २०२३ च्या सत्रात नमूद केल्याप्रमाणे या सत्रात आपण ए.आर.एच. च्या कोतापूर केंद्रातील दवाखान्याच्या आवारात केलेल्या नाचणी लागवडीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
दवाखान्याच्या पाठीमागे असणाऱ्या दोन गुंठे जमिनीवर नाचणीची लागवड केली होती. सर्वप्रथम ९ जून या दिवशी ही जमीन व्यवस्थित नांगरून घेतली. नांगरल्यानंतर रोपांच्या संरक्षणासाठी जमिनीच्या सभोवताली जाळीचे कुंपण केले. नांगरणीनंतर १२ जूनला या जमिनीमध्ये ९० किलो शेणखत सर्वत्र पसरले व ते मातीत व्यवस्थित मिसळवले. आणि नाचणी चे बियाणे या जमिनीवरील एका कोपऱ्यात पेरले. बी पेरल्यानंतर ४-५ दिवसांनी (१६ जून च्या सुमारास) ते रुजून आले व त्यातून छोटी रोपे तयार झाली. या दिवसात पावसाळा असल्यामुळे वेगळे पाणी द्यावे लागले नाही.
२५ जुलै ला रोपांची रोम्ब्याच्या सहाय्याने पुन्हा लागवड केली. २-३ दिवसांच्या अंतराने रोपांचे निरीक्षण करणे सुरु ठेवले. रोपांची वाढ होतांना दिसत होती. वेळोवेळी शेत बेणणी केली जात होती.
काही काळाने असे लक्षात आले की कुंपण असूनही रोपांचे डूक्करांमुळे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे पाऊस योग्य प्रमाणात नसल्यामुळे फुलांचा बहर कमी आला होता.
२९ ऑक्टोबर या दिवशी नाचणीची कणसे काढून ती उन्हात वाळत ठेवली. २ /३ दिवस झाल्यानंतर म्हणजेच २ नोव्हेंबर या दिवशी ती कणसे काठीने झोडपून त्यातील नाचणी वेगळी करून पोत्यात भरून ठेवली. नाचणीचे एकूण उत्पादन १२ किलो झाले.
निरीक्षणे:
- पाऊस कमी झालेला असताना रोपांना बाहेरून पाणी दिले गेले नाही.
- डूकरांमुळे रोपांचे नुकसान झाले होते.
वरील कारणांमूळे नाचणीच्या उत्पादनात घट झाली.
जाळीचे कुंपण उन्हाने कमकुवत झालेले असल्यामुळे डूक्करांना शेतात शिरता आले. हे लक्षात घेता पुढच्या वेळी लागवड करताना प्राण्यांनी शेताचे नुकसान होणार नाही अशी संरक्षण व्यवस्था करायला हवी.
पुढील सत्रात मे २०२४ मध्ये आपण टोमॅटो लागवडीचा आढावा घेणार आहोत.
February 2024
Farm management
Ragi Cultivation
In this session we are going to take a brief look at cultivation of Ragi. It was cultivated in the premises of the ARH’s clinic at Kotapur centre.
Ragi was cultivated on about 2 guntha land. On 9th June this land was ploughed. Shednet fence was built around the land. Then on 12th June 90 Kg cow dung was spread all over this land and mixed it well with soil. Ragi seeds were sown at the one corner of this land. Within 4 to 5 days germination of seeds took place and small seedlings were formed. Because of rainy season external water supply was not required.
On 25th July seedlings were replanted. All seedlings were growing in due course. They were observed to grow properly at an interval of 2/3 days. Weeds were removed intermittently.
After few days it was observed that though there was fencearound the land animals like pigs destroyed some ears of ragi because the net became weak due to heat. And due to inadequate rain, blossom of flowers was less. On 29th October Ragi ears were cut and placed for drying. After 2/3 days i.e. on 2nd November ears of ragi were threshed and grains were separated from it. Total production of Ragi was 12kg.
Observations:
- When there was no rain, water was not provided to Ragi crops.
- Pigs destroyed some ears of ragi
Due to above mentioned reasons production of ragi was lowered than expected. Considering lower production due to attack of pigs, for next season of Ragi cultivation we should do proper arrangements for protection of crops.
In the next session May 2024 we will be discussing about tomato cultivation.