एप्रिल 2022

शेती व्यवसाय व्यवस्थापन

या सत्रात आपण जागेचे व पिकांचे संरक्षण कसे करावे या बद्दल विचार करुया. कल्पना अशी करुया की 5 एकर जागा आपण घेतली आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने आपणाला योजना आखायची आहे. त्यातील पाणी, जमीन, सूर्यप्रकाश व हवा या घटकांचा विचार आपण मागील सत्रात केला.

संपूर्ण जागेला कुंपण घालणे आवश्यक असते. आपली जागा कुठली याची माहिती असण्यासाठी व गाई-गुरांपासून संरक्षणासाठी. त्यासाठी लहान दगडांचे गडगे अथवा चिर्‍याची भिंत येथे बांधतात.

खालील प्रश्र्नांची उत्तरे शोधून आपण अराखडा आखूया. जागेत येण्याजाण्यासाठी दरवाजा (गेट) हवा. माणसांसाठी येथे आंगर ठेवण्याची पध्दत आहे. त्यामुळे आत बाहेर करतांना प्रत्येक वेळेस गेट उघडावे लागत नाही.

गडग्याची भिंत –

  1. जागेमध्येच गडग्याला लागणारे दगड मिळतील का? बर्‍याच वेळेला दगड कमी पडतात. दोन पर्याय असतात. जागेमधील मोठ्ठाल्या दगडांचे लहान दगड  छिनी किंवा हातोडीच्या किंवा मशीनच्या सहाय्याने तयार करणे. ते शक्य नसेल तर विकत घेणे.
  1. गडगा बांधणे ही एक कला आहे. त्याचा थोडाफार आढावा  घेऊया. त्याची रचना व अंदाजे खर्च?     

ओबडघोबड, ठराविक आकार नसलेले किंवा चांगले दगड घेऊनही गडगा बांधता येतो.

रचना – दगडांची दुहेरी रांग करतात. अशी रांग आपल्याला हव्या असलेल्या उंचीपर्यंत एकावर एक दगडांचे थर  बसवून तयार करतात. सर्वात वरच्या थरावर दुहेरी रांगेवर बसेल इतका मोठ्ठा दगड घेऊन  बसवतात. दगड एकमेकांत घट्ट बसावेत यासाठी दगडांमध्ये माती किंवा लहान लहान दगड घालतात.

अंदाजे खर्च – एक एकर जमिनीसाठी साधारणपणे 850 फूट लांब व 2.5 फूट उंच असा गडगा घालण्यासाठी येणारा खर्च पुढीलप्रमाणे —
दगड व माती स्वतःची असेल म्हणजे आपल्याच जागेतून मिळणार असेल तर खर्च साधारणपणे  45,000/- रुपये इतका येईल.

– दगड स्वतःचे नसतील, माती स्वतःची असेल तर खर्च साधारणपणे 95,000/-ते एक लाख रुपये इतका येईल.

– दगड व माती दोन्ही स्वतःचे नसतील तर खर्च साधारणपणे एक लाख ते 1,10,000/- रुपये इतका येईल.

(गडग्याचे पुढील फोटो पहा)

चिर्‍याची भिंत – गडग्यापेक्षा याचा खर्च जास्त असतो. ही दोन प्रकारे बांधतात. पहिला प्रकार म्हणजे सलग एकाला एक जोडून चिरे असलेली किंवा दुसरा प्रकार म्हणजे मध्ये भोक किंवा रिकामी जागा असलेली. दोन्ही बाबतीत एकावर एक चिरे बसवून भिंत बांधता येते. यामध्ये चिरे मजबूत घट्ट बसण्यासाठी सिमेंट व रेतीचा वापर करतात. अशी भिंत बांधतांना जमिनीला चर पाडून म्हणजेच खड्डा करून किंवा जमीन चिर्‍याच्या आकारत फोडून  त्यात पहिला चिरा लावून जमिनीलगतचा थर बसवला जातो. नंतर त्यावर वरची उभारणी केली जाते.अंदाजे खर्च – चिर्‍याच्या किमतीवर खर्च अवलंबून असतो. अखंड भिंतीसाठी अंदाजे 2.5 लाख तर भोक असलेल्या भिंतीसाठी 1,60,000/-

(चिर्‍याच्या दोन्ही प्रकारच्या भिंतीचे खालील फोटो पहा.)

पिकांचे संरक्षण – डुकरे, माकडे यांच्यापासून पिकांचे संरक्षण हा एक कठीण प्रश्र्न आहे.त्यासाठी 
                             प्रचलित असलेले उपाय बघुया.
  1. जुन्या साड्यांचे कुंपण
  2. मासेमारीच्या जाळ्याचे कुंपण
  3. लोखंडी तार

एका गृप बरोबर झालेली चर्चा –

याच भागात राहणार्‍या व वेगवेगळ्या गडांवर जाणार्‍या तरुणांच्या गृपमध्ये हा विषय निघाला. राखीव जंगल ठेवणे हा एक उपाय सुचविला गेला. परंतु त्यासाठी एवढी मोठ्ठी सलग जागा मिळणे व संरक्षक भिंत अथवा अन्य काही व्यावस्था करणे सुध्दा कठीण आहे असा मतप्रवाह आढळला. त्यातील 2-3 जणांनी पुढील मार्ग सुचविला —  येथे किनार्‍याला लागून लहान-मोठ्ठे गड आहेत. बर्‍याच गडांची भिंत पडक्या अवस्थेत आहे. ती दुरुस्त करून त्यामध्ये जंगल तयार करणे, या जंगलांमध्ये गावागातील वानर, माकड, डुक्कर इ. प्राणी नेऊन सोडणे, त्यांना अन्न-पाणी मिळण्याची सोय करणे. अशी राखीव जंगले पर्यटकांनाही आकर्षित करतात. सरकार, सामाजिक कार्य करणारे व प्राणी प्रेमी तरूण-तरूणी या सर्वांनी मिळून वनअधिकार्‍यांच्या सहाय्याने योजना अखावी व अमलात आणावी.

April 2022

Management of Agriculture

In this session we will discuss how to protect the field and plantation therein. Let us assume that we have 5 Acres of land. We need to have methodical plan so that farming will give us sustainable income. We have considered last time water, soil, sunlight and air and how they affect the production.

It is necessary to have fencing to the whole piece of land. In this area small stone wall (Gadga in local language) or the stones obtained from digging the rocky area (Chini – in local language) are used to erect the wall.

Gadga – (Stone wall) (See the photo)

  1. To get the stones in the plot itself is the first question. If the quantity is less, then it is possible to break the big stones with the help of iron rod or by breakers.
  2. To erect stone wall is an art. Let us review the procedure and the cost.
  • The stones may be of different size.
  • First make two rows of stones parallel to each other as a base by digging ground few inches.
  • Put stones one upon another in two rows making height as per our requirement. Generally, 4 to 5 feet height is sufficient.
  • At the top put a big size stone to strengthen the wall.
  • Put soil or small pieces of stones as scaffolding material.
  • Expenses – For 1 acre of land roughly the wall will be 850 ft in length and 2.5 feet in height (assumed)

1. If stones are there and soil is brought – Rs. 95,000/-

2. If stones and soil are brought from outside Rs. 1,10,000/-

(Expenses will vary from time to time)

Chira Wall –

  • Chira wall may be with a gap or without gap. (See the Photo)
  • It is more easier to erect Chira wall. For scadfda cement and reti can be used.
  • For Chira wall one has to dig the ground about ½ to ¾ feet.
  • Expenses – For 1 acre of land roughly the wall will be 850 ft in length and 2.5 feet in height (assumed)

Gate – The gate should be sufficiently wide for easy movement of big vehicles. A small gate can be kept separately for visitors.

Protection of plantation – Wild pigs, monkeys and cows/bulls are the troublesome animals destroying plantation and causing tremendous financial loss and mental agony. Currently following methods are used which may be successful partially.

  1. To put old sarees encircling plantation.
  2. Wire
  3. Net

Suggestions from youths –

  1. Create protected forest.
  2. Acquiring place may be difficult. It is possible to use forts which are in a dilapidated state. Protected walls can be built and wild tree plantation can be done inside the fort.
  3. If properly execute such places can fetch finance from tourists. Youths in the area can discuss this issue with forest officer and relevant government departments.